स्व.शिवाजीदादा यांनी सुरु केलेला कारखाना बंद करण्याचे सर्व कारस्थान विकासपुरूषांनी केले. सन2003 मध्ये भाईंनी शिवाजीदादांना बाजूला करून कारखाना स्वतःच्या ताब्यात घेऊन भावाला चेअरमन पदी बसवले.त्यावेळी साडेचार लाख क्विंटल साखर शिल्लक होती.मोलँशेस शिल्लक होते.पाच लाख टन ऊस गाळपासाठी उभा होता.कारखाना सुस्थितीत असतांना.भाईंचे निष्क्रिय संचालक मंडळ राजीनामे देऊन पळून गेले.व कारखाना प्रशासकाच्या ताब्यात दिला.तेव्हा पासून या कारखान्याची परिस्थिती बिघडली.शेतकऱ्यांना आर्थिक दुर्बल करण्याचे काम या स्वयंघोषित विकास पुरूषांनी केले.त्याच प्रमाणे दुध संघ,बागायतदार संघ,खरेदी विक्री संघ,त्याच प्रमाणे स्व संस्थापक असलेली सुतगिरणी सह सर्व प्रकल्प बंद पाडण्याचे उद्योग या उद्योगपतींनी केले.अनेक निवडणूका साखर कारखाना सुरू करण्याची खोटी आश्वासने देऊन पार पाडल्या.मग या विकास पुरूषांनी शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काय दिवे लावले?शेतकऱ्यांच्या संस्था बंद पाडून स्वतःच्या संस्था उभ्या केल्या व स्वतःचे खिसे भरण्या शिवाय काय दिवे लावले? साखर कारखाना गेल्या आठ वर्षापासून विकास पुरूषांच्या ताब्यात आहे. जनता /शेतकरी जागा झाला आहे.त्याला आता कारखाना सुरू करण्याचे खोटे आश्वासन देऊन चालणार नाही,जनतेला विकास पुरूष शेतकऱ्यांच्या किती हे समजले आहेत हे तेव्हढेच खरे आहे