June 30, 2025 5:05 am

पंकज ठाकरे अपक्ष अर्ज दाखल करणार..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पंकज ठाकरे अपक्ष अर्ज दाखल करणार..
सामाजिक कार्याचा झंजावत लावत अल्पावाधितच २१७ गावात ४५ उपक्रम राबवित कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी हिंगणा मतदार संघात मोठी ओळख निर्माण केली आहे. पंकज ठाकरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हिंगणा मतदार संघांसाठी तिकीट मांगितली होती. ते इच्छुकांच्या स्पर्धेत आघाडीवर होते. तरुण व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून त्यांना तिकीट देण्यात यईल अशी जनतेला आशा होती.
हिंगणा मतदार संघाची तिकीट रमेश बंग यांना देण्यात आली आहे. पंकज ठाकरे हें आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्यामुळे त्यांना डावलल्या गेले अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. पंकज ठाकरे यांनी निराश न होता सर्व जनतेला नम्र आवाहन
केले आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी सामान्य कष्टकरी गोरगरीब जनतेचा व कामगारांचा हक्काचा उमेदवार म्हणून उद्या अर्ज भरत आहे . एका होतकरू प्रामाणिक कामगाराची ताकद काय असू शकते हे आपल्याला सर्वांना दाखवायची आहे. अर्ज भरण्यासाठी कुणीही उद्या हिंगण्याला येऊ नये .आपल्या पैशाचा, राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय करू नये .आपली सर्व ताकद मतदानाच्या दिवशीच दाखवुन एक गरीब प्रामाणिक कामगार पोरगा आमदार बनू शकतो हे दाखवून इतिहास रचावा अशे त्यांनी आवाहन केले आहे….

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!