करमाळा प्रतिनिधी:- करमाळा तालुक्यातील शिवसेना महिला आघाडीतील पदाधिकारी नियुक्त्या सचिव संजय मोरे, आमदार मनिषा कायंदे, संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, मी स्वत: महिला जिल्हा प्रमुख आरती बसवंती तसेच करमाळा तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांच्या विचार विनिमयाने केलेल्या असून यामध्ये उपजिल्हा प्रमुख ज्योती शिंदे, शहर प्रमुख रोहिणी यादव, उप शहर प्रमुख रूपाली शिंदे, उपतालुका प्रमुख म्हणून साधना गोसावी, शामल रंदवे, लक्ष्मी पोळ, सुषमा तनपुरे, युवतीसेना तालुका प्रमुख म्हणून अमृता गोसावी, चिखलठाण गट प्रमुख लता भोसले, तालुका समन्वयक माया गव्हाणे, शाखा प्रमुख सिंधू शेंडगे, अश्विनी हुंबे, मनिषा कारंडे असे अनेक पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
परंतु आमच्याच पुरुषांचे जिल्हाप्रमुख चिवटे हे स्वत: महिलांना बोगस पदे लावून त्यांची बॅनरवर तसेच पेपरबाजी करून नागरिकांची व पक्षाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यामुळे करमाळा शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांच्या लेटरपॅड वर दिलेली पदेच अधिकृत असून इतर सर्व पदाधिकारी बोगस रितीने दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत आहे. असा प्रकार पक्षात अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा यावेळी बसवंती यांनी चिवटे यांना दिला.