June 29, 2025 4:53 pm

वसुबारस निमीत्त उद्या करमाळा शहरात गोमातेची भव्य शोभा यात्रेचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीरामनवमी उत्सव समिती तसेच सकल हिंदू समाज करमाळा यांच्या वतीने करमाळा शहरात प्रथमच वसुबारस निमीत्त गोमातेची भव्य शोभा सोमवार दि.28/10/2024 रोजी सकाळी 09.00 वा. श्री खोलेश्वर मंदीर, किल्ला वेस येथून शोभायात्रा काढली जाणार आहे.

तरी गोमातेच्या शोभा यात्रेत ज्यांना गोमातेचे पूजन करायचे असेल त्यांनी आपल्या घराच्या बाहेर पूजेचे ताट घेवून गोमातेची पूजा करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे. वसुबारस निमीत्त केलेल्या गोमातेच्या शोभा यात्रेचे विविध स्तरातून कौतुक होत असून या निमीत्ताने गोमातेची पूजा करण्याचे भाग्य लाभणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात असून ठिकाणी या आयोजनाबाबत समाधान व्यक्त होताना पहायला मिळत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!