November 21, 2024 11:51 am

मुंबई च्या नगरीत प्रतापियन्स चा प्रामाणिक पणा, अन् आजीचा देवावरचा विश्वास झाला आणखी तृढ..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुंबई च्या नगरीत प्रतापियन्स चा प्रामाणिक पणा, अन् आजीचा देवावरचा विश्वास झाला आणखी तृढ..

प्रताप कॉलेजच्या प्रामाणिक पणा आणि शिक्षणावर मुंबईकरना गर्व

 

विक्की जाधव : मार्मिक न्यूज नेटवर्क 

खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय इतिहास विभाग व संशोधन केंद्र ची सहल नुकतीच मुंबई नगरी मध्ये गेली होती.

दिनांक 26 रोजी सायंकाळी 7 .00 वा खान्देश एक्सप्रेस ने दादर येथे जातांना आरक्षण कंपार्टमेंट मध्ये 30 विद्यार्थी प्रवास करत होते. समोर च्या शीटवर जळगाव बळीराम पेठेतील पूर्व निवासी आणि सध्या विरार येथे 40 वर्षापासुन स्थाईक असलेल्या वाणी परिवारातील माई वाणी या 70 वर्षीय महिला एकट्याच प्रवास करीत होत्या. सहल प्रमुख डॉ धनंजय चौधरी यांनी आजींना विद्यार्थिनीकडे रात्री प्रवासात लक्ष् ठेवण्यास सांगितल. तेव्हा जुनी आठवण निघाली. आजोबांच्या शेजारची राहताना जळगाव ची जुनी ओळख निघाली. पहाटे 4.30 वा आजी विरार स्टेशनवर उतरून गेल्या. मात्र, त्यांची पर्स समोर शीटवरच राहिली होती. एम. ए. इतिहास वर्गातील कु.कामिनी गुरव, कु.काजल पाटील आणि इतर विद्यार्थिनींच्या हे लक्षात आल्यावर दादर येथे उतरतानाच त्यांनी विभाग प्रमुख डॉ धनंजय चौधरी, प्रा. मुठे आणि प्रा.

भाग्यश्री जाधव यांच्याकडे ती पर्स दिली.

मुंबई भायखळा शाळेत सध्या शिक्षक असलेले अमळनेर प्रताप चे माजी विद्यापीठ प्रतिनिधी विद्यार्थी श्री अरविंद गव्हाणे हे प्रवासात सोबत असल्याने तात्काळ फलाट क्रमांक 1 वरील दादर रेल्वे पोलिस स्टेशन मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तोवर आजीच्या फोन वर जळगाव येथून आजीचा मुलगा श्री सारंग वाणी यांचा फोन आला त्यांनी विचारपूस केली. त्यांनी आजीला दादर येथे पोलीस स्टेशनला पाठवितो. आपण तिकडे पर्स जमा करा. त्यात घराची चावी आहे असे सांगितले. पोलीस स्टेशन ला पर्स ची तपासणी केली आणि रजिस्टर नोंद केली. त्यात 15 हजार चा मोबाईल, रोख रक्कम, विरारच्या घराची चावी, थोडे काही दागिने, कागदपत्रे, आधार कार्ड इत्यादी वस्तू नोंदीनुसार जमा केल्या. आणि सहली च्या पुढील प्रवासासाठी सर्व विद्यार्थी चर्च गेट कडे रवाना झाले. 2 दिवस सहलीत ऐतिहासिक स्थळ दर्शन करताना विरारच्या वाणी कुटुंबातून धन्यवाद चे फोन येत होते. आजीने सांगितले की विरार स्टेशन वर उतरल्यावर रिक्षा मध्ये बसताना भाडे साठी पैसे देतांना त्यांच्या लक्षात आले की पर्स नाही.

मला काय करावे समजत नव्हते. मी श्री शिवाय: नमोस्तुभ्यंम जा जप केला आणि परमेश्वराचं नामस्मरण केले. त्यांना एका पोलीस भगिनीने दादर ला जाण्यासाठी 30 रुपये भाड्यासाठी दिले. परमेश्वर आहे तो पोलीस भगिनी आणि प्रतापच्या विद्यार्थिनींच्या रुपात होता असे त्यांनी फोन वरुण सांगितले. आणि मुंबई च्या नगरीत हरवलेली वस्तु परत मिळत नाही असेशेजारी सांगत होते. पण ती ग्रामीण भागातील गावावरील संस्कार आणि प्रताप कॉलेज ची शिकवण आणि शिस्त आहे याचा त्यांनी फोन वरुण प्रामाणिक पनाचा धन्यवाद व्यक्त करून संदेश दिला. मा. प्राचार्य डॉ ए. बि. जैन सर यांनी विद्यार्थिनीचे, सर्व सहल सहभागी आणि प्रमुखांचे कौतुक केले. आणि महाविद्यालयाची शिस्त अणि उज्वल परंपरा कायम ठेवल्याचा देखील संदेश देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!