June 29, 2025 3:01 am

गोवर्धन गावातील लोकनियुक्त सरपंच आणि तरुण असंख्य कार्यकर्त्यांनी शिरीष दादा चौधरी मित्र परिवारात केला जाहीर प्रवेश 

अपनी भाषा में पढ़े! Translate

गोवर्धन गावातील लोकनियुक्त सरपंच आणि तरुण असंख्य कार्यकर्त्यांनी शिरीष दादा चौधरी मित्र परिवारात केला जाहीर प्रवेश 

 

अमळनेर : विक्की जाधव 

आगामी विधानसभा काही दिवसावर येऊन ठेपली असून प्रत्येक राजकीय नेत्यांची आपल्या कार्यपद्धतीने मोर्चेबांधणी सुरू असून प्रत्येक राजकीय पुढारी वेगाने कामाला लागला आहे. यावेळी अमळनेर विधानसभा क्षेत्रात होणारी विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची असून प्रत्येक उमेदवारास आपले डावपेच नवीन पद्धतीने वापरावे लागतील यात शंका नाही.

 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवर्धन या गावातील लोकनियुक्त सरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर विश्वास ठेवत शिरीष दादा मित्र परिवारात मोठ्या संख्येने प्रवेश केला यावेळी यावेळी श्री शिरीष दादा तुम मागे बढो हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा देत या विधानसभेत आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिरीष दादा चौधरी यांना बहुमताने विजय करून आणू असाही तरुण कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शिरीष दादा चौधरी म्हणाले की तुम्ही मला साथ द्या मी अमळनेरचा विकासात कोठेही कमी पडणार नाही.

एका क्षणात सर्वांचे स्वागत करून त्यांच्यासोबत संवाद साधून शिरीष चौधरी यांनी एकत्रितपणे एक नवा अध्याय लिहू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन रवींद्र बापू चौधरी, अबू महाजन, अवि जाधव, बाळासाहेब संधांशिव, राजू चौधरी, सुधीर चौधरी, मनोज शिंगणे, राहुल कंजर. आधी कार्यकर्ते उपस्थित हो

ते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!