November 22, 2024 2:08 am

तालुका अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे.. पण संभाजी होळकर यांच्या कामाचीच सगळीकडे चर्चा

अपनी भाषा में पढ़े! Translate

तालुका अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे.. पण संभाजी होळकर यांच्या कामाचीच सगळीकडे चर्चा
बारामती ( सह-संपादक – संदिप आढाव)
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाच्या तालुका प्रभारी अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.मात्र ऐन विधानसभा निवडणुक जाहीर झालेवर अध्यक्षपदी झालेला बदल पक्षाच्या कार्यकर्त्यांना रुचणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी पक्षात सर्व पदाधिकारी यांच्यात नाराजी पसरली होती.खुद उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होते.अशातच पक्षाचे विद्यमान अध्यक्ष संभाजी होळकर यांनी ५ मेला मतमोजणी अगोदर स्वतः हुन राजीनामा दिला होता‌ व नवीन अध्यक्ष निवडा अशी मागणी केली होती.मात्र लोकसभेत पराभव झाले नंतर अजित पवार यांनी आॅगस्ट महिन्यात सर्व पदाधिकारी यांना राजीनामा देण्याचे फर्मान काढले होते.पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी पदाचा राजीनामा दिला होता.नंतर मात्र दोन महिन्यांनी पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे यांची निवड करण्यात आली.
या धामधुमीत ज्यांनी पक्षासाठी २४ तास काम केले, पक्षाचे १३ वर्ष अध्यक्षपद भूषविले होते असे संभाजी होळकर यांच्या सारखा व्यक्ती पुन्हा एकदा अध्यक्ष व्हावा असे सर्व कार्यकर्ते यांना वाटत होते.
संभाजी होळकर यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत चोख पणे पार पडली होती.सन २०१२ पासून झालेल्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखाना, मार्केट कमिटी,दुध संघ आदी महत्त्वाच्या निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गेली १३ वर्ष पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारणार करुन पक्षाच्या हितासाठी रात्र दिवस काम केले.शासनाच्या विविध योजना प्रत्यक्षात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या.गावातील रस्ता,पाणी,विज, आरोग्य,शिक्षण आदी बाबत झटुन काम केले.
‌‌दरम्यान तालुक्यातील प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तींची ओळख असलेल्या संभाजी होळकर यांनी जाती धर्मात समानता व एकोपा निर्माण केला होता.
या सर्व कार्याचा विचार करता संभाजी होळकर हे अजातशत्रू होते.जरी शिंदे प्रभारी अध्यक्षपदी निवड झाली असली तरी अजूनही संभाजी होळकरच अध्यक्ष व्हावेत अशी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना वाटत आहे.
संभाजी होळकर म्हणजे कामाचा माणूस…
गावाचा सरपंच ते युवक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद बांधकाम सभापती, संजय गांधी निराधार योजना, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा बँक संचालक व इतर महत्वाच्या पदावर कार्यरत राहुन आपल्या पदाला न्याय देऊन जनसेवा करणारे संभाजी होळकर हे कायम चर्चेत राहणारे व्यक्तीमत्व होय.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!