November 21, 2024 9:30 pm

आमदार संजयमामांचा मास्टरस्ट्रोक… करमाळेकरांची कृत्रिम पाणीटंचाई संपणार !

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा(प्रतिनिधी)- करमाळा शहरासाठी उजनी जलाशयातून पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव पंपहाऊस येथे  २४० अश्वशक्तीचे दोन विद्युत पंप खरेदीसाठी नगरपरिषद प्रशासनाने निधीची मागणी केल्यानंतर आमदार संजयमामा शिंदे यांनी अवघ्या महिनाभरातच शासनाकडून १कोटी ४०लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून यामुळे आता करमाळेकरांसमोरील कृत्रिम पाणीटंचाईचे संकट लवकरच संपुष्टात येणार आहे.

करमाळा शहराला होणारा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने आमदार संजयमामा शिंदे यांनी मागील महिन्यात पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले की, सन १९९३ साली दहिगाव येथून कार्यान्वित झालेल्या या योजनेसाठी २४० अश्वशक्तीचे दोन व २०० अश्वशक्तीचा एक असे तीन पंप बसवण्यात आलेले असून हे पंप जुने झाल्याने वारंवार नादुरूस्त होत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यावेळी आमदार शिंदे यांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत ऐवढया दिवस निधीची मागणी का केली नाही ? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाला तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेले होते.

उजनीत पूर्ण क्षमतेने भरलेली असतानादेखील पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने निर्माण होणाऱ्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे शहरवासीय हैराण झालेले होते. आता आमदार शिंदे यांच्या माध्यमातून पंप खरेदी करण्यासाठी तातडीने निधी मंजूर झाल्याने नवीन पंप बसविल्यानंतर शहरासमोरील पाणीसंकट कायमस्वरूपी दूर होणार असल्याने शहरवासीय आणि विशेषतः महिला वर्गाकडून आमदार संजयमामा शिंदे यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!