धक्कादायक बातमी;मदनवाडी येथील युवकाचा दगडांनी ठेचून एकाचा खून
(निलेश गायकवाड)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार….
भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत मोजे मदनवाडी गावातील गायरान माळरानावर इसम नाव विजयकुमार विट्टलराव काजळे, वय 45, रा. निरगुडे व त्याचा मित्र राज भगवान शिंदे, वय 20 वर्षे रा मदनवाडी हे दोघे रात्री एकत्र बसले होते, दोघांमध्ये भांडण होऊन राज शिंदे याने विजयकुमार काजळे याचे डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला.सदर घटणे बाबत भिगवण पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन माहिती घेत आरोपी भिगवण पोलिसांच्या ताब्यात घेत पुढील कारवाई करण्यात येत आहे.
मदनवाडी येथील झालेल्या घटनेबाबत परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे . झालेल्या घटनेबाबत परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.