110 कोटी रुपयाचे कामे आपत्ती व्यवस्थापनाची नांदी अमळनेरच्या सुरक्षेची! कुठली सुरक्षा अन् कुठले आपत्तीचे व्यवस्थापन..
अमळनेर : विक्की जाधव.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस इतर अनेक नेतेंडळींनी सपशेल दांडी मारली असून मंत्री अनिल पाटील यांच्या कर्तुत्व कार्य शैलीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनसामान्यांचे साडेचार कोटी रुपये खर्च करून निव्वळ बॅनर बाजी आणि मंत्री महोदय यांचा मोठमोठे भाषणा ठोकण्याचा ह्या कार्यक्रमाचा पावसानेच केला उध्दार म्हणजे देवाला ही खोटे बोलणे चालत नाही ह्या विषयाची व्याप्ती येथे खरी ठरली.
पैशाचा उदमात करून गर्दी जमा करता येऊ शकते, परंतु देव्हाऱ्यातला देव काढून घेण्याची भाषा करणाऱ्या मंत्री महोदयांची भाषा म्हणजे हा पैशाचा माजचं झाला असावा याची स्वाभिमानी अमळनेरकर नक्कीच जाण ठेवतील यात शंका नाही.
लाडक्या बहिणींना मोबाईल फोन, साड्या देण्याच्या आमिषाने अन् मिळणारे १५०० रुपये महिना बंद होतील, असेही दिले खोटे आश्वासन..
लाडक्या बहिणींसाठी कार्यक्रम तत्पूर्वी कार्यक्रमासाठी मंत्री अनिल पाटील यांनी साडेचार कोटी रुपये खर्च केले असून बचत गट आणि व्यावसायिक लाडक्या बहिणींना मोबाईल टॅब आणि साडी देण्याचे आमिष दाखवून हे कार्यक्रम ठिकाणी मिळेल त्या गाडीने प्रवास करून या अशी दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात सदर कार्यक्रमास गर्दी जमवली असून ग्रामीण भागातील लाडक्या बहिणीनी भर पावसात हाल अपेष्टा सोसून कार्यक्रमाला आल्या खऱ्या परंतु परतीच्या प्रवासासाठी ग्रामीण भागातील महिलांना उशीर होत असून काही महिलानी अर्ध्या कार्यक्रमातूनच आपला निसटता पाय काढून कार्यक्रम सोडून निघू लागल्या.
या ठिकाणी होता कार्यक्रम..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी सन्मान सोहळा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गटाच्या लाडक्या बहिणींचा मेळावा मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेरच्या प्रताप कॉलेज येथे आयोजित केला होता. कार्यक्रमास ग्रामीण भागातून शासकीय आणि प्रायव्हेट वाहनांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचाही प्रयत्न झाला. या परतीच्या प्रवासात काही महिलांना प्रवासासाठी वाहन मिळत नव्हती वरून पाऊस सुरू असल्याकारणाने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना मोठा त्रास सहन करावा लागला.