जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. कृषिभूषण साहेबराव पाटील
अमळनेर : विक्की जाधव
खरीप हंगाम 2024 जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी व आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेला नियोजन असे म्हटले आहे की जून ते सप्टेंबर 2024 सरासरीपेक्षा अधिक 119% पाऊस पडला असून अतिवृष्टीमुळे कापसासह सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून खरीप हंगाम 2024 हातातून गेल्याने शेतकरी पुन्हा हातात झाले आहेत शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून जनतेची शासनाप्रती असंतुषाची भावना निर्माण झाली असून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी सह आर्थिक मदत करावी.
असे निवेदनात म्हटले आहे.