आमदार संतोष पाटील दानवे यांच्या शुभ हस्ते भोकरदन येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नुतन इमारतीचे भूमीपुजन तर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे लोकापर्ण संपन्न…
भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील सुरंगलीकर ।। दि. 09
भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी मा.केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातुन 22 कोटी 52 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन आनला असुन सदर उपजिल्हा रुग्णालयाच्या नुतन इमारतीचा भूमीपुजन सोहळा आमदार संतोष पाटील दानवे यांच्या शुभ हस्ते बुधवार दि. 09/10/2024 रोजी मोठया उत्साहात संपन्न झाला. तसेच भोकरदन पंचायत समितीच्या 7 कोटी रुपये खर्च करुन बांधकाम करण्यात आलेल्या सर्व सोयीसुविधायुक्त सुसज्ज नुतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पन सोहळा ही यावेळी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तर प्रमुख अतिथी म्हणुन सर्वश्री जि.प.सदस्य गणेशबापु फुके, भाजपा उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष तुकाराम जाधव, मुकेश चिने, भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पा.ठाले, माजी पं.स.सभापती विलासशेठ आडगांवकर, लक्ष्मण मळेकर, भानुदास सरोदे, फकिरचंदबापु इंगळे, इरफानखाॅ पठाण, परमेश्वर लोखंडे, डाॅ.प्रमोद कुलकर्णी, टिकाराम निमरोट, भाऊसाहेब काकडे, माजी पं.स. सभापती विनोद गावंडे, माजी पं.स.उपसभापती सुखलाल बोडखे, जि.प.सदस्य सौ.आशाताई पांडे, पं.स.सदस्य ऋषी पगारे, संतोष वाघ, गणेश लोखंडे, कैलास सहाणे, कैलास गव्हाड, भगवानराव रावळकर, नंदकुमार गिÚर्हे, कमलाकर साबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलांना आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले की, जालना जिल्हयामध्ये भोकरदन तालुका हा सर्वात मोठा तालुका असुन या तालुक्यामध्ये भोकरदन ग्रामीण रुग्णालय हे एकमेव रुग्णालय आहे. भोकरदन शहरासह तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयालाच्या सोयीसुविधा या वाढत्या लोकसंख्येमुळे आपुÚया ठरत होत्या. त्यामुळे रुग्णांना परिपूर्ण सुविधा पुरविणे शक्य होत नव्हते, ही बाब विचारा घेवुन दिवसेंदिवस वाढत जाणाÚया लोकसंख्येला अत्यावश्यक आरोग्य सुविधा योग्य वेळी उपलब्ध व्हाव्यात म्हणुन मा.केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मध्यमातुन मी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे भोकरदन ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन आय.सी.यु कक्षासह 50 खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय मंजुर करणे बाबत मागणी केली होती. सदरील मागणीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत या मंत्री महोदयांनी तातडीने प्रतिसाद देवुन मागील वर्षातच 22 कोटी 52 लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला होता. सदर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची निवेदा प्रक्रिया पूर्ण करुन आज या रुग्णालयाच्या कामाचे भूमीपुजन करतांना मला मनस्वी आनंद होत आहे. भोकरदन तालुक्यातील रुग्णांना अत्यावश्यक सेवेसाठी आता जालना किंवा छ.संभाजीनगर येथे जाण्याची गरज पडणार नसुन नविन उपजिल्हा रुग्णालय रुग्णांना सर्व अत्यावश्यक सेवा तातडीने भोकदन येथेच उपलब्ध करुन देईल याची याची मी खात्री देतो असे ही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भोकरदन तालुक्यामध्ये 125 ग्रामपंचायती असुन या 125 ग्रामपंचायतींचा कारभार हा पंचायत समितीच्या माध्यमातुन चालवीला जातो. व त्या निमित्ताने गावागावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रासेवक व पदाधिकारी यांचा वावर हा पंचायत समितीमध्ये असतो. त्यासोबतच राज्यशासनाच्या व जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाÚया घरकुल योजना, पाणीपुरवठा योजना, शौचालय, स्वच्छता अभियान, ग्रामपंचायतीचे विविध वित्त आयोग यासह बÚयाच योजनांची प्रत्यक्ष आमंलबजाणी ही पंचायत समितीच्या माध्यमातुन करण्यात येते. त्यामुळे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व पदाधिकारी व सर्वसामान्य जनता ही कायम पंचायत समितीमध्ये येत असते. परंतु भोकरदन येथे पंचायत समितीची जुनी इमारतीत पुरेशी नसल्यामुळे व पंचायत समितीचे विभाग विखुरलेले असल्यामुळे सरपंचासह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. ही बाब विचार घेवुन पंचायत समितीचे सर्व विभाग हे एकाच छताखाली काम करु शकतील अशी एक सर्व सोयीसुविधांनीयुक्त सुसज्ज प्रशासकीय इमारत भोकरदन येथे पंचायत समितीसाठी बांधणे आवश्यक होते त्यामुळे मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे नुतन इमारतीसाठी मा.केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मध्यमातुन 7 कोटी रुपयांची मागणी केली होती. उक्त चारही मंत्री महोदयांनी माझ्या मागणीला तातडीने प्रतिसाद देत चार वर्षापुवीच हा निधी मंजुर केला होता. आणि मंजुर करुन आणलेल्या निधीच्या माध्यमातुन भोकरदन पंचायत समितीच्या सुसज्ज प्रशासकीय इमारत माझ्याच कार्यकाळात पूर्ण झाली असुन आज सदर इमारतीचे लोकापर्ण माझ्या हस्ते होत असतांना मला मनस्वी आनंद होत आहे. ही पंचायत समिती भोकरदन तालुक्यातील सर्व गांवाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी व ग्रामपंचायतींना सशक्त करण्यासाठी बहुउपयोगी ठरेल असा विश्वास मला आहे. ही पंचायत समतीची इमारत ही केवळ सरकारी इमारत नसुन ती स्वतःच्या कारभारासाठी बांधलेली इमारत असल्यामुळे ही सरकारी इमारत न समजता आपले स्वतःचे घर समजुन येथे येणाÚया सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेने या वास्तुची स्वच्छता व निगा राखावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्यने तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती होती.