वालचंदनगर पोलिसांनी शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना कायदेशीर मार्गदर्शन केले
(निलेश गायकवाड)
वालचंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी भवानीनगर छत्रपती हायस्कूल वालचंदनगर,वर्धमान विद्यालय बी सी ए हायस्कूल लासुर्णे, नीलकंठेश्वर विद्यालय कळंब, वर्धमान जुनिअर कॉलेज जंक्शन, मोहोळकर कॉलेज शेळगाव मुक्ताई हायस्कूल येथील आठवी ते बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले.
लैंगिक अपराधांना प्रतिबंध कौटुंबिक हिंसाचार विनयभंग ऑनलाईन फसवणूक डायल 112 मोटार वाहन कायदा नियम कायदेविषयक माहिती देऊन मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित होते.प्रत्येकास पोलीस अधिकारी पीएसआय आणि वालचंद नगर पोलीस स्टेशन यांचे फोन नंबर संपर्कासाठी देण्यात आले.