November 22, 2024 10:39 am

राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त)अमळनेरच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत बस स्थानकावर स्वच्छता मोहीम

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त)अमळनेरच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत बस स्थानकावर स्वच्छता मोहीम

अमळनेर : विकी जाधव

भारत सरकार, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली, राष्ट्रीय सेवा योजना (मंत्रालय कक्ष), उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या मार्गदर्शनाने, दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर यांच्या वतीने अमळनेर बस स्थानकावर “स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत 100 हून अधिक NSS स्वयंसेवकांनी उत्साही सहभाग घेतला आणि प्लास्टिक व इतर कचऱ्याचे संकलन करून परिसर स्वच्छ केला. बस आगारातील पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या कार्यावर समाधान व्यक्त केले.

या उपक्रमात प्रमुख उपस्थिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर आणि प्रा. डॉ. धीरज वैष्णव, अधिसभा सदस्य व सहसचिव खानदेश शिक्षण मंडळ यांची होती. त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेच्या महत्त्वावर भर देऊन प्रेरित केले. स्वच्छता अभियानाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. हेमंत पवार आणि सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुनील राजपूत यांनी केले. या उपक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान प्रताप महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, आणि स्वच्छता मोहीम हा त्यातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!