अनुकंपाची नोकरी मिळावी अन् आपले लपावलेले प्रेमसंबध सर्वासामोरं येणार या भीतीने प्रियकराच्या मदतीने भावजयीचा गळा दाबून खून
अवघ्या चार तासात पोलिसांनी शोधले नणंद व तिचा प्रियकर आरोपी
अमळनेर : विक्की जाधव.
अनुकंपाची नोकरी मिळावी. आणि आपले लपावलेले प्रेमसंबध सर्वासामोरं येणार या भीतीने प्रियकराच्या मदतीने भावजयीचा गळा दाबून खून केल्याची घटना २२ रोजी सकाळी गांधलीपुरा भागात मेहतर कॉलनीत घडली. पोलिसांनी शोधच्क्रे फिरवत चार तासात उलट तपासणी करत आरोपीचा लावला छडा.
पारोबाईची मुलगी मंगला घोगले व सून शीतल जय घोगले या दोघी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शौचास गेल्या होत्या. मुलगी मंगला ही १० ते १५ मिनिटात परत आली सुनबाई परत का आली नाही म्हणून विचारले असता, मी लाकडे घेऊन येते असे सांगून मला पुढे पाठवले. बऱ्याच वेळानंतर सून परत आली नाही म्हणून सर्व जण तिला शोधायला ईकडे तिकडे जाऊन बघु लागले तेव्हा काटेरी झुडुपात गेले असता शीतल रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिच्या हातावर व डोक्यावर वार झाले होते. तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनेचे वृत्त कळताच मेहतर समाजाचे २०० ते २५० लोकांचा ग्रामीण रूग्णालय येथे जमला व आरोपी अटक करत नाही तोपर्यंत प्रेत उचलणार नाही तसेच पोस्टमार्टेम पारदर्शी झाले पाहिजे म्हणून जमाव आग्रही होता. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी मृत महिलेचे शव इंनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. संतप्त जमावाचा रोष पाहता पोलिसांनी विविध दिशेने तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली. शीतल सोबत गेलेल्या मंगला हिचीच चौकशी सुरू केली. मंगला हिने मी शौचाहून अवघ्या पाच मिनिटात परत आली असे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांना ती सीसीटीव्ही मध्ये तब्बल २५ मिनिटांनी परत येताना दिसली. मंगला हीचा मागील काळापासून प्रियकर असल्याचे समजताच तिला विचारपूस केल्यावर मी त्याच्याशी कधी पासून बोललेली नाही असे तिने सांगितले प्रत्यक्ष सिडीआर रिपोर्ट तपासले असता ती वारंवार आणि रात्री देखील प्रियकरशी बोलल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा दोघांवर अधिक संशय बळावला. तत्पूर्वी दोघांचे एकमेकांवर प्रेमसंबंध होते हे शीतल ला माहिती होते. हे भांडे फुटायला नको म्हणूनच तिची निर्घृण हत्या करण्यात आली असा अंदाज व्यक्त होत होता. आणि अनुकंपाची नोकरी देखील आपल्याला मिळेल आणि आपण प्रियकरासोबत आनंदाने जगू या उद्देशाने मंगला हिनेच प्रियकर करण मोहन घटायडे वय ३४ रा अयोध्यानगर बंगाली फाईल याच्या मदतीने गळा दाबून व दगडाने डोक्यावर व हातावर वार करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. सदर घटनेची अमळनेर पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.