करमाळा प्रतिनिधी :- करमाळा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत तीन आमदार शिवसेनेचे या तालुक्यात होऊन गेलेले आहेत. मध्यंतरी युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी पत्रकारांना माहिती देताना जाहीर केले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख कार्याकडे युवक आकर्षित होत असून आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी इनकमिंग करणार आहे. सदर वृत्ताला दुजोरा मिळाला असून मकाई सहकारी कारखान्याची निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली होती असे कुणाल पाटील यांनी नुकताच त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रा.शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे.
कुणाल पाटील यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेत व युवासेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून शिवसेनेच्या व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या प्रवेश झाल्यानंतर मोठा जल्लोष साजरा केलेला दिसून आला. कुणाल पाटील यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क असून आजपर्यंत त्यांनी विविध माध्यमांतून जनतेची सेवा केलेली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेवून सर्व सामान्यातील नेतृत्व निर्माण करण्याची धमक पाटील यांच्यात आहे. त्यामुळे करमाळयातील शिवसेनेला नक्कीच बळकटी मिळणार आहे.
यावेळी शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, युवा सेना जिल्हा समन्वयक निखील चांदगुडे, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, शिवसेना उपतालुका प्रमुख शिवसेना उपतालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, युवा सेना उप जिल्हा प्रमुख श्रीकांत गोसावी उप तालुका प्रमुख मनोज रोकडे उप शहर प्रमुख अनिकेत यादव उप तालुका प्रमुख विशाल पाटील उप तालुका प्रमुख अनिकेत यादव