न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

राजस्थान उत्तर प्रदेशच्या धर्तीवर करमाळा तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकार संपादकांना शासन दरबारी न्याय मिळवून देणार ‌- आमदार संजय मामा शिंदे

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- राजस्थान उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर करमाळा तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकार संपादकांना शासन दरबार ‌मान्यता देऊन न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असे मत करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी व्यक्त केले.
करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचेवतीने आमदार संजयमामा शिंदे यांना ‌ डिजिटल मीडिया पत्रकारांच्यासाठी कल्याणकारी योजना मागण्यासंदर्भात विविध मागण्यांचे ‌ निवेदन डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या आदेशानुसार संघटनेचेवतीने निवेदन देण्यात आले. .यावेळी डिजिटल करमाळा तालुका डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटना तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके ‘उपाध्यक्ष शितल कुमार मोटे सचिव नरेंद्र सिंह ठाकुर सहसचिव सूर्यकांत होनप हर्षवर्धन गाडे,तुषार जाधव, संघटक अंगद भांडवलकर खजिनदार एडवोकेट सचिन हिरडे राजू सय्यद, राहुल रामदासी, सागर गायकवाड उपस्थित होते. करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की राज्यातील महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणीपासून शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, बांधकाम कामगार, शिक्षक, शासकिय, निमशासकिय कर्मचारी अगदी रिक्षा व टॅक्सी चालकांपर्यंतच्या विविध घटकांसाठी आपण अनेक योजना राबविल्या असून सर्वांना न्याय दिला आहे. मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पत्रकार दुर्लक्षित राहीला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी धोरण ठरविण्याची गरज आहे. महानगरातील झोपडपट्ट्या व उच्चभूवर्गापासून ते थेट राज्यातील वाड्या-वस्त्यांवर प्रभावीपणे पोहोचलेल्या डिजिटल मिडिया पत्रकारांकडे मात्र आपले दुर्लक्ष झाले आहे. देशातील अनेक राज्यांनी आपले डिजिटल मिडिया धोरण जाहीर करून डिजिटल पत्रकारांना दिशा दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांनीही दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी उत्तर प्रदेशचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करून तिथल्या डिजिटल मिडियाला आधार दिला. राजस्थान व उत्तर प्रदेशच्या धतीवर त्यापेक्षाहो व्यापक धोरण युध्दपातळीवर आपण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी, ही आमची आपणाकडे आग्रही मागणी आहे. तसेच विधीमंडळ अधिवेशनात सरकारने जाहीर केल्यानुसार वृध्द पत्रकारांना तातडीने दरमहा २० हजार रुपये सन्मान मानधन सुरु करावे. करमाळा तालुक्याचे आमदार म्हणून पत्रकाराच्या कल्याणासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन आमच्या मागण्या मान्य करुन राज्यातील पत्रकारांना पाठबळ देवून आधार व न्याय द्यावा, ही अशी मागणी केली आहे. यावेळी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी याबाबत डिजिटल मीडिया पत्रकार धोरणाबाबत शासन सकारात्मक असून याबाबत धोरण निश्चित करण्याचे काम चालू आहे. करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या भावना लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडे पोहोचवणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून आपणास न्याय मिळवून घेणार असल्याचे सांगितले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!