बहूजनांच्या डोक्याला झालेला भटशाहीचा कँन्सर कधी बरा होणार ?
दत्तकुमार खंडागळे
बहूजन समाजाचे प्रबोधन करत करत कित्येक लोक खपले. एकेकाने आपले आयुष्य पणाला लावले. सर्व सतांनी या येड्याच्या कानी-कपाळी ओरडून ओरडून सांगितले. महाराष्ट्राच्या मातीत झालेल्या संतांच्या मांदियाळीने या लोकांना हरत-हने समजावले पण अजूनही बहूजन समाजाचं मस्तक सुधारलेलं नाही. अजूनही त्याच्या धडावर त्याचे मस्तक आलेले नाही. त्याच्या डोक्यात ठाण मांडून बसलेला भट अजूनही संपलेला नाही. या मानसिक रोग्यांना कधी जाग येणार की नाही ? बहूजनांच्या अजून किती पिढ्या अशाच मानसिक गुलामीत संपणार आहेत ? हा प्रश्न सतत अस्वस्थ करत राहतो. हे चित्र पाहिलं की संतानी आपलं जीवन या लोकांसाठी व्यर्थ का घालवलं असेल ? असा प्रश्न पडतो. संत तुकाराम, संत सावता माळी, सत सेना, संत चोखोबा, संत जनाई, मुक्ताई, संत गाडगेबाबा अशा मांदीयाळीने आपले अखंड आयुष्य वेचले. कैक संतांनी तर या येड्या-भाबड्या बहूजन समाजासाठी बलिदान दिले तरीपण हा समाज असाच येडा आहे ? तरीही तो मुर्खासारखा भटशाहीला कवटाळून का बसतो ? हा प्रश्न अस्वस्थ करून सोडतो. बहूजनांच्या मेंदूत असला कसला लोचा आहे की त्याला भटाशिवाय जमतच नाही ?
परवा एका शाळेत पालक मिटीगसाठी जायचा योग आला होता. सदर पालक मिटींगमध्ये एका विद्यार्थ्याला त्याच्या वर्ग शिक्षकांनी विचारले की, “तु परिक्षेला का आला नव्हता ? दोन पेपर बुडवलेस, कुठे होतास ? यावर त्या विद्यार्थ्याने जे उत्तर दिले ते भयंकर होते. बहूजनांच्या ‘मती’ची ‘माती’ कशी झाली आहे ? याचा अस्सल पुरावा देणारे ते उत्तर होते. सदर विद्यार्थ्याने सांगितले की, “माझी शांती करायची होती म्हणून मी परिक्षेला आलो नव्हतो. घरचे मला शांती करण्यासाठी घेवून गेले होते !” त्याचे हे उत्तर ऐकल्यावर मला हजार विंचू एकाचवेळी डसावेत तसं झालं. त्याचे उत्तर खुप अस्वस्थ करून गेले.
विद्येवीना मती गेली ।
मतीवीना निती गेली ।
नितीवीना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शुद्र खचले ।इतके अनर्थ एका अविद्येने केले।
असं महात्मा फुलेनी लिहीलं आहे. पण त्यांनाही या शिक्षीत असलेल्या बावळट बहूजन समाजाने चुकीचे ठरवले आहे. या भाबड्या बहूजन समाजाला विद्या मिळावं म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीमाय फुलेंनी आयुष्य वेचले. स्वत:चे अवघे जीवन पणाला लावले. विद्या घेवूनही हा समाज मानसिक गुलामीतून बाहेर पडायला तयार नाही. महात्मा फुले़ंना काय वाटलं असतं आज ? पोराची परिक्षा सोडून त्याचे आई-बाप त्याला शांती करायला घेवून जातात. त्याचे दोन पेपर बुडवून शांती केली जाते. हा प्रकारच भयंकर आहे. आजही हे घडावं ? भटांना काय दोष द्यायचा ? शांतीसाठी हजारो रूपयेची माती करतात, भटाची भरती करतातच पण त्यासाठी पोरांच्या शिक्षणाचीही माती करावी ? भटांना इतकं कळत असतं, देव, ग्रह त्यांच्या अंकीत असते तर त्यांनी चड्डीला नाड्या आणि बटनं लावली नसती ना ? स्वत:च्या कमरेची चड्डी ज्यांच्या अंकीत रहात नाही अशा शेंबड्यांना ग्रह शांत करता येतील का ? त्यांनी कुठल्यातर नदीकाठी पुटपुटून ग्रह शांत होतो का ? घरात बायको त्यांना चोपते हे तिला शांत करू शकत नाहीत आणि ग्रह कसे शांत करणार ? पण अंधश्रध्देची भांग प्यायलेल्या बहूजनांना अकला कधी येणार ? हा खरा प्रश्न आहे.
सांगली जिल्ह्यातील भिलवडीजवळ औदूंबर येथे माझ्या एका मित्राचे घर आहे. त्याचे घर अशाच एका भटजीने भाड्याने घेतले होते. एके दिवशी सदर मित्राच्या घरी गेल्यावर त्याने जी माहिती दिली ती इथं जशीच्या तशी देतो. त्याच्या घरी राहिलेल्या भटजीकडे शांती करायला खुप लोक यायचे. त्याने शांतीसाठी मांडलेला पाट अनेक वर्षे बदलला नव्हता. तो पाट व त्या पाटावरील साहित्य सर्व प्रकारच्या शांतीसाठी तो वापरत होता. ग्राहक बदलत होते, शांतीचे प्रकार बदलत होते पण पाटावरचे साहित्य मात्र कधीच बदलत नव्हते. कित्येक तरूणांची लग्न ठरत नाहीत म्हणून ते शांती करायला या भटाकडे यायचे व शांती करून जायचे. विशेष म्हणजे जो भट शांती करायला आलेल्यांची लग्न व्हावे म्हणून शाती करत होता पण त्याचेच वय उलटले तरी लग्न झालेले नव्हते. पण शांती करता करता त्याने बक्कळ माया छापली होती. शांतीच्या जीवावर त्याने एका वर्षात साठ लाखाची एक आणि चाळीस लाखाची एक अशा दोन गाड्या खरेदी केल्याची माहिती मला त्या मित्राने दिली. आता यात भटाला काय दोष द्यायचा ? तो त्याचे दुकान मांडून बसलाय. जायचं की नाही ती ग्राहकाची इच्छा. तो थोडाच नरडीला दोर लावून नेतो की डोक्याला रिव्हॉल्वर लावून नेतो ? आम्हालाच इतकी खाज की भट आल्याशिवाय आमचं पान हलत नाही. ते किती बी येड असलं तरी आमचं हे येडं त्याच्या पायाचं तिर्थ पितंच. त्याच्या पायाच्या तिर्थाचं आचमन करतच. त्या शिवाय याचे पोटच साफ होत नाही. आई मेली भट हवा, बाप गेला भट हवा, लग्न केलं भट हवा, घर बांधलं भट हवा, दुकान चालू केलं भट हवा, लग्न ठरवायचय तर भट हवा. मुलगी-मुलगा पहायला जायचय तर भट हवाच. पत्रिका पाहिलीच पाहिजे. लग्नाची तारीख ठरवायची आहे तरी भट हवाच. कुठे जायचय, मुहूर्त काढायचाय तर भट पाहिजेच. त्याच्याशिवाय आमच्या लोकांचे पान हलत नाही. त्यांचा कुठलाच कार्यक्रम भटाशिवाय होत नाही. फक्त पोरं जन्माला घालायलाच अजून भटाची गरज वाटत नाही. हा एकच विभाग सोडला तर आपल्या लोकांना सर्वत्र भट हवाच असतो. त्याच्याशिवाय आमचे पान हलत नाही. डॉक्टरांच्यात जसा ‘कट प्रॅक्टीस’ प्रकार असतो तसाच इथे पण असतो. शांती सुचवणा-यांचे कमीशन असते. शांती करणारा भट शांतीच्या नावाखाली हजारो रूपयांचा चुना लावतो. ज्याने शाती सुचवली व शांतीसाठी पाठवले त्यालाही कमीशन दिले जाते. ही साखळी आहे आणि या साखळीचा हा धंदा खुप तेजीत आहे. शिकले-सवरलेले मुर्ख लोकही या गोष्टी करतात हे पाहून दु:ख होतं.
आजही बहूजन समाज असाच मुर्खासारखा वागतो ? आजही भटांच्या कपोलकल्पीत थोतांडाला कवटाळून जगतो. त्याला योग्य काय, अयोग्य काय ? हे कळत नाही ? या येड्यांना समजवता समजवता किती महापुरूष खपले ? कित्येकांनी जीव गमावले. कित्येकांचे भटांनीच मुडदे पाडले. महात्मा बसवेश्वर मारले, संत कबीर मारले, संत तुकाराम मारले. तुकोबारायांचा तर या भडव्यांनी खून केला आणि ते सदेह वैकुठाला गेल्याची थाप ठोकून दिली. आमच्या येड्या भाबड्या बहूजन समाजाला ती खरी वाटली. विशेष म्हणजे आजही विद्नान युगात ही थाप खरी वाटते. तुकारामांचा खून झाला होता म्हंटले तर कैक येडे अंगावर येतात. ते सदेह वैकुठलाच गेल्याचे ठासून सांगतात. आमचे लोक शिकले-सवरले पण भटशाहीने नासलेला त्यांचा मेंदू सरळ झालाच नाही. शिक्षणानेही त्यांच्या मेदूला चढलेला अंधश्रध्देचा गंज निघाला नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला “वाघिणीचे दुध” म्हंटले पण बहूजन समाजाने त्यांना चुकीचे ठरवत शिक्षणाला नागिनीचे विष बनवले. प्रबोधन करणा-या संतांचे भटशाहीने खून पाडले. ही खुनाची परंपरा आजतागायत चालू आहे. पानसरे, दाभोळकरांच्या पर्यंत हे खूनसत्र आलय. प्रबोधन करणा-या लोकांचे मुडदे पाडण्याचे सत्र आजही सुरूच आहे. तरीही बहूजन समाजाच्या डोक्याला झालेला भट नावाचा कँन्सर बरा व्हायला तयार नाही. अजून किती महापुरूष पचवणार आम्ही ? त्यांना पचवून मुर्खपणाच्या करपट ढेकरा अजून किती पिढ्या देणार आहोत ? हा खुप अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो.956551006