न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

शरद दिलबर वानखेडे यांनी स्वतः पुढे येत केले व्यायामशाळेचे उठघाट्न. मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह??

अपनी भाषा में पढ़े! Translate

शरद दिलबर वानखेडे यांनी स्वतः पुढे येत केले व्यायामशाळेचे उठघाट्न. मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?? 

 

अमळनेर : विक्की जाधव. 

शासनाच्या उपोरोक्त निधीतून बांधलेली व्यायामशाळा केवळ मंत्र्यांच्या वेळेअभावी वापरात येत नव्हती, तालुक्यातील वावडे येथील तरुण ग्रामस्थांनी विविध माध्यमातून व्यायाम शाळेचे लवकरात लवकर उद्घाटन होऊन व्यायाम शाळा वापरता यावी. यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले परंतु निव्वळ मंत्री महोदय यांच्या हाट्टाहा पायी नारळ वाढवून निव्वळ फोटो काढण्यासाठी थांबलेले हे उद्घाटन अखेर गावातीलच नागरिक असलेले शरद दिलबर वानखेडे यांनी स्वतः पुढे येत केले व्यायामशाळेचे उठघाट्न.

या संदर्भात अधिक माहिती अशी की मागील सहा महिन्यांपासून मंत्री अनिल पाटील यांच्याकडे या व्यायामशाळेच्या उद्घाटनासाठी वेळच नव्हता. यामुळे गावातील तरुण पिढी व्यायामाच्या सोयी-सुविधांपासून वंचित राहिली होती. सध्या विधानसभेचे वातावरण चांगलेच तापले असून आचारसंहिता लागण्याच्या पहिले मंत्री महोदय सर्वीकडे फिरताय परंतु यांची वेळ आणि निधी दोन्ही प्रश्नचिन्हात असुन सहा महिन्यांपासून रखडलेले हे उद्घाटन आणि व्यायामशाळेचा वापर सुरु न होणे हे शरमेचे असुन याचे परिणाम युवपिढीला त्रासदायक ठरले आहे. शासनाच्या उपरोक्त निधीतून बांधलेली व्यायामशाळा केवळ मंत्र्यांच्या अट्टहासा पाई आणि वेळेअभावी वापरात येत नाही, हा प्रकार मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.

 

स्थानिक तरुणांनी मार्मिक शी बोलताना मांडले आपले म्हणणे..

यावेळी स्थानिक तरुणांनी मार्मिक शी बोलताना सांगितले की पहिलेच व्यायाम शाळा एवढ्या लेट बांधली त्यात तुमच्या नारळ फोडण्याची ही गावकऱ्यांनी वाट बघावी का? तर मतदारांपेक्षा मंत्री मोठे आहेत का? असे स्थानिक तरुणांनी यावेळी बोलून दाखवले. मंत्री अनिल पाटील यांनी वेळ न दिल्याने, तरुण पिढीला व्यायामाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. हे अमळनेरातचं घडू शकते असे एकाने बोलून दाखवले. अमळनेर चीं जनता सुज्ञ आहे. अशी ही चर्चा यां वेळी रंगली. तर तुम्हाला आमच्यासाठी वेळ नाही तर येत्या विधानसभेत तुम्ही प्रचारार्थ आमच्याकडे याल तेव्हा मतदार म्हणून आम्हालाही वेळ असेल का??

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!