प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न..
अमळनेर : विक्की जाधव.
येथिल खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रताप महाविद्यालयाच्या ईनडोर व क्रीडागंणावर दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी” राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त ” विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यात व्हॉलीबॉल,बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस अश्या विविध खेळ प्रकारात जवळपास 215 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला.
प्रस्तुत स्पर्धा उदघाटन प्रसंगी खा.शि. मंडळाचे अध्यक्ष श्री.जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष सौ.माधुरी पाटील, विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, रोटरी प्रेसिडेंट ताहा बुकवाला, सेक्रेटरी विशाल शर्मा,जेष्ठ संचालक हरी भीका वाणी,संचालक श्री.योगेश मधुसूदन मुंदडा,प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे, श्री.प्रदीप भाऊ अग्रवाल,खा.शि. मंडळाचे सचिव व आदरणीय प्राचार्य डॉ.अरुण बी जैन, प्रताप तत्वज्ञान केंद्र प्रमुख डॉ.दिलीप भावसार,उप प्राचार्य डॉ. विजय तुंटे, डॉ. योगेश तोरवणे,जिमखाना समन्वयक व सिनेट सदस्य प्रा.डॉ.संदीप नेरकर ,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे,क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,प्रा.अमृत अग्रवाल, कुलसचिव राकेश निळे, प्रा.अर्चना पाटील,प्रशांत देवकाते,संदिप सराफ,मिलिंद शिंदे,गुणवंत पाटील,दिपक चौगुले व सर्व खेळाडू, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी,खेळाडू उपस्थित होते.यावेळी बहुविध खेळांचे सादरीकरणाद्वारे मेजर घ्यानचंद यांना श्रद्धांजली देण्यात आली.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृत अग्रवाल यांनी केले, तर प्रस्तावना जिमखाना विभागाचे समन्वयक प्रा.डॉ. एस बी नेरकर यांनी केले.