प्रताप महाविद्यालयात व्याख्यान संपन्न, तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचा उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात व्याख्यान संपन्न, तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचा उपक्रम..

महिलांच्या लैंगिक छळ व रॅगिंग विरोधी कायदा बाबत जनजागरण.

अमळनेर : विक्की जाधव.

येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग अँड सेक्युलर हरेसमेंट समिती व तालुका विधी सेवा समिती अमळनेर, वकील संघ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम 29 ऑगस्ट रोजी पूज्य सानेगुरुजी सभागृहात घेण्यात आले. याप्रसंगी एडवोकेट राजेंद्र व्ही. निकम( सदस्य, वकील संघ अमळनेर) यांनी पोक्सो ऍक्ट अर्थात,बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम या विषयी विस्तृत अशी माहिती दिली.तर एडवोकेट यज्ञेश्वर पी.पाटील (सदस्य, वकील संघ,अमळनेर) यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ कायद्याविषयी माहिती विशद केली. एडवोकेट जगदीश यु.बडगुजर (सदस्य, वकील संघ अमळनेर) यांनी रॅगिंग विरोधी कायदा व वाहतुकीचे नियम बद्दल सुक्ष्मत्वाने माहिती दिली.

प्रस्तुत समारंभ प्रसंगी मंचावर एडवोकेट अविनाश व्ही.खैरनार, एडवोकेट किशोर डी.पाटील,खानदेश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष आदरणीय माधुरीताई पाटील, सुनिल पाटील (वरिष्ठ सहाय्यक,तालुका विधी सेवा समिती, अमळनेर) त्याचप्रमाणे संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान खानदेश शिक्षण मंडळाचे सचिव व तथा प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन यांनी भूषविले . समितीच्या सदस्या डॉ.वंदना भामरे, डॉ. प्रियंका पाटील, श्रीमती एस व्ही. महाले, विद्यार्थिनी प्रतिनिधी अंकिता सावंत, प्रा. पुष्पा पाटील, प्रा.भाग्यश्री जाधव,

प्रा.वृषाली महाजन, प्रा.हेमलता सूर्यवंशी

प्रा.मनीषा मोरे, प्रा.सुचित्रा रत्नपारखी यांच्या सह सभागृहात मोठ्या संख्येने प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे समन्वयक प्रा.डॉ.कल्पना पाटील यांनी केले तर आभार समितीच्या सदस्य तथा गणित विभाग प्रमुख डॉ.नलिनी पाटील यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!