June 29, 2025 7:27 pm

गोगाजी नवमी उत्सवानिमित्त अमळनेर शहरात भव्य छडी मिरवणूक मोठ्या उत्साहात पडली पार..

अपनी भाषा में पढ़े! Translate

गोगाजी नवमी उत्सवानिमित्त अमळनेर शहरात भव्य छडी मिरवणूक मोठ्या उत्साहात पडली पार..

महावीर हनुमान होतें मोठे आकर्षण..

अमळनेर : विक्की जाधव. 

गोगाजी नवमी उत्सवानिमित्त अमळनेर शहरात भव्य छडी मिरवणूक मोठ्या उत्साहात पडली परिसरातील बॅन्ड, नागरिकसाठी मुख्य आकर्षण होते. यवतमाळ येथील ढोल ताशा पथक,आणि महत्वाचे महावीर हनुमान यांची मूर्ती, कालिका माता मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आकर्षण ठरली. यां अमळनेर शहरात वाल्मिकी मेहतर समाजाने काढलेल्या मिरवणुकीचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतकं होत आहे. तर छडी मिरवणुकीत मध्ये श्री रामाची पूर्णकृती मूर्ती विराजमान होती. झामी चौक, मंगला देवी चौक, पवन चौक, तिरंगा चौक, सुभाष चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मिरवणूक विसर्जन करण्यात आले.

 

सामाजिक कार्यकर्ते बुद्धा जाधव, सामाजिक कार्यकर्ते विकी जाधव, सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव, सामाजिक कार्यकर्ते आकाश जेधे,( डॅनी ) सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव, सनी जाधव, राजेश दाभोडे, मितेश जाधव सुदेश भुरट, निलेश भुरट, सुनील भुरट, राकेश दाभोडे, शक्ती दाभोडे, आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी वाल्मिकी मेहतर समाज,आणि रामदेवजी बाबा ग्रुप, तसेच झामी चौक परिसरातील नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

गोगाजी नवमी: इतिहास आणि परंपरा..

गोगाजी नवमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे जो दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस महान योद्धा आणि लोक देवता गोगाजींना समर्पित आहे.

इतिहास..

गोगाजींना सापांचे देवता म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की त्यांनी साप आणि इतर विषारी प्राण्यांपासून लोकांचे रक्षण केले होते. गोगाजी नवमीच्या दिवशी, लोक मंदिरात जातात, पूजा करतात आणि भजन गातात. या दिवशी विशेष पूजा केली जाते आणि प्रसाद चढवला जातो. लोक आपले घर सजवतात आणि उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात. सापांची पूजा: सापांचे देवता म्हणून गोगाजींची पूजा केली जाते. गोगाजी नवमीचे महत्त्व: सांस्कृतिक महत्त्व: हा सण भारतीय संस्कृती आणि परंपरा दर्शवतो.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!