छत्रपतींचा पुतळा नव्हे ..
राष्ट्र निर्मितीचा ध्वज कोसळला….
(विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)
सिंधुदुर्ग,मालवण : नौदल दिनानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभ्यारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केलं होतं. त्यानंतर आता पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या प्रकाराबाबत भाष्य केलं आहे.तसेच,
“झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि या कार्यक्रमाला आम्हीसुद्धा उपस्थित होतो. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्याची संपूर्ण रचना नौदलाने तयार केली होती. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की, ४५ किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामध्ये पुतळ्याचे नुकसान झालं. उद्याच तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. पुन्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा करण्याचे काम आम्ही करु,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
तर झालेल्या घटनेसंदर्भात शिवप्रेमींनमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे…
सिमेंटमध्ये ‘जान’ असून चालत नाही, बांधनाऱ्यांच्या काळजात ‘इमान’ असावं लागतं आणि ते तुमच्या काळजात नाही….
शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांच्या नेतृत्वात उभा राहिलेला ‘शिवरायांचा पुतळा’ आजही तसाच आहे आणि वर्षभरापूर्वी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण झालेला मालवण येथील शिवरायांचा पुतळा कोसळतो…! निषेधार्थ हे सगळं….! अशाप्रकारे शिवप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.