January 31, 2025 4:50 am

वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण उज्वल भवितव्यासाठी उपयुक्त : प्रा.डॉ.संदीप वडघुले यांचे प्रतिपादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण उज्वल भवितव्यासाठी उपयुक्त : प्रा.डॉ.संदीप वडघुले यांचे प्रतिपादन..

अमळनेर : विक्की जाधव 

खान्देश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय,अमळनेर, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (RUSA)आणि वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेच्या वतिने वाणिज्य पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी परिव्यय लेखांकनातील करियरच्या संधी तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य व

 श्री गोगाजी नवमी उत्सव व छडी मिरवणूक निमित्त सर्व भाविक भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा.

शुभेच्छुक : बुद्धा जाधव. विक्की भाऊ जाधव. विशाल जाधव.

व्यवस्थापन शाखेतील नेट-सेट स्पर्धा परीक्षांची तयारी या दोन्ही विषयांवर डी.जे.मालपाणी (स्वायत्त) महाविद्यालय,संगमनेर येथिल प्रा.डॉ. संदीप वडघुले यांच्या दोन व्याख्यानांचे आयोजन केले होते, त्यातील आपल्या पहिल्या व्याख्यानात त्यांनी नेट(NET),सेट (SET) या महत्वपूर्ण परीक्षांचे स्वरूप,आवेदन करण्याची पद्धती,पात्रतेच्या अटी, अभ्यासाची कार्यपद्धती याबद्दल विस्तृत अशी माहितीचे सादरीकरण केले.

आपल्या दुसऱ्या व्याख्यानात ते म्हणाले की,परिव्यय लेखांकन (Cost Accounting) हा व्यवसाय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे, ज्यामध्ये उत्पादन आणि सेवांच्या किमती ठरविण्याचे तंत्र समाविष्ट असतात. यामध्ये कंपनीच्या आर्थिक व्यवस्थापनाचा पाया मजबूत करण्यासाठी माहिती पुरवली जाते.

परिव्यय लेखाकनातील करिअरच्या संधी खूप विस्तृत आहेत आणि ते विविध उद्योगांत उपलब्ध आहेत. त्यामुळे वाणिज्य व व्यवस्थापनाचे शिक्षण ही काळाची गरज असून उद्याचे भविष्य हे कॉमर्सचे विद्याशाखेचे आहे.

प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खान्देश शिक्षण मंडळाचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन हे होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उप प्राचार्य व वाणिज्य व्यवस्थापन प्रशाळेचे संचालक डॉ.योगेश तोरवणे,विभागातील डॉ.ज्ञानेश्वर मराठे, डॉ.किरण सुर्यवंशी, डॉ.किरण भागवत, डॉ.अनिल झळके, डॉ.बालाजी कांबळे, प्रा.लुनकरण चोरडीया, प्रा.कपिल मनोरे यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून या व्याख्यानांचा लाभ घेतला आणि उपयुक्त माहिती मिळाल्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रीया देखिल व्यक्त केले.

प्रस्तुत कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी केले होते, त्यात सूत्रसंचालक म्हणून कु.अंकिता सावंत, कल्याणी वाणी यांनी यशस्वी भूमिका पार पाडली.याचप्रमाणे कृतिका मुंदडा, जागृती चौधरी यांनी प्रमुख मार्गदर्शक व अतिथींचे आभार मानले. अतिथी व्याख्यानाच्या एकूण नियोजनात वाणिज्य शाखेचे विद्यार्थी तन्मय नेरकर, तन्मय पाटील,जानवी शिंदे,दिनेश बारेला तसेच सागर कोळी यांचे विशेष स्वरूपाचे सहभाग व योगदान होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!