June 28, 2025 8:02 pm

दौंड शहरातील शिवसेना कार्यालयात रक्षाबंधन दिन साजरा,.मुस्लिम महिलांनी ननवरे यांना राखी बांधून मुख्यमंत्र्याना दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड शहरातील शिवसेना कार्यालयात रक्षाबंधन दिन साजरा,.मुस्लिम महिलांनी ननवरे यांना राखी बांधून मुख्यमंत्र्याना दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा.

प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड शहरांमध्ये शिवसेना दौंड शहर प्रमुख श्रीनाथ ननवरे यांना मुस्लिम महिलांनी राखी बांधली व
शहरांमध्ये १ जुलैपासून शिवसेना कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात आले सदरचे अर्ज नि:शुल्क दरामध्ये कोणताही जातीभेद हिंदू ,मुस्लिम, ख्रिश्चन असा भेदभाव न करता सर्व स्तरातील महिलाचे अर्ज भरण्याचे काम करण्यात आले. ज्या महिलांना वाचता लिहिता येत नाही अशा महिलांना मदत करणे, त्यांना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे यासाठी शिवसेना कार्यालयातील सर्व सभासद मित्रांनी शिवसैनिकांनी सर्व महिलांना मदत केली. सदरच्या कार्यालयातून अंदाजे दहा ते बारा हजार अर्जाची नोंदणी करण्यात आली. 17 ऑगस्ट पासून अनेक महिलांच्या अकाउंट वर तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला. तसेच अनेक महिलांना आपले फॉर्म अप्रोल झाले म्हणून चे मेसेज आले त्या महिलांना त्यांच्या अकाउंट वरती 4500/_ रुपयांचा पहिला हप्ता जमा होणार आहे.
रक्षाबंधनानिमित्त दौंड मधील मुस्लिम महिलांनी दौंड शहर शिवसेना प्रमुख श्रीनाथ ननवरे यांना राखी बांधून आनंद व्यक्त केला. त्यावेळेस महिलांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा व दिले.यावेळी
अंजुम काजी म्हणाल्या आत्तापर्यंत अनेक सरकारांनी महिलांसाठी अनेक योजना कागदावरती आणल्या पण मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्यक्षात आम्हाला मदत केली आहे. दीड हजार रुपयांपेक्षाही त्यांनी मुख्यमंत्र्याची बहीण म्हणून जो सन्मान दिला आहे तो सन्मान महत्त्वाचा आहे. आम्ही सदैव आमचे भाऊ मुख्यमंत्री शिंदे यांना खंबीरपणे मदत करणार आहोत असे यावेळेस सांगितले कार्यक्रमासाठी अंजुमन काजी, सीमा नारंग, सायली कांबळे, सिमरन पगी, रहीना शेख, मुमताज पठाण, चांद बेबी सय्यद, अर्जुन मांडवाला, सोमनाथ दिवटे आसिफ सय्यद उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!