June 29, 2025 2:39 pm

सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने २४ ऑगस्ट २०२४ रोजी सातव्या आंतरराष्ट्रीय सुरताल महोत्सवाचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने २४ ऑगस्ट २०२४ रोजी सातव्या आंतरराष्ट्रीय सुरताल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पं विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं के एन बोळंगे गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा शिक्षक सोसायटी, देवीचा माळ रोड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांच्या गायनाने सुरुवात होणार असून सायंकाळी ५.०० वाजता इतर राज्यातील कलाकारांची प्रस्तुती होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा माननीय रश्मी दिगंबरराव बागल यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे ,यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील , सहारा इन्स्टिट्यूट च्या अध्यक्षा डॉ श्रद्धा जवंजाळ, कृष्ण हॉस्पिटलच्या डॉ कविता कांबळे, तपश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक श्रेणीक खाटेर, नगरसेवक महादेव अण्णा फंड, नगरसेवक अतुल भैय्या फंड इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सुरताल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्याबरोबरच विविध राज्यातील कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत. यात प्रामुख्याने डॉ. सुस्मिता झा (दिल्ली) शास्त्रीय गायन, श्रीमती सुमना बायें (कोलकत्ता-वेस्ट बंगाल) कुचिपुडी नृत्य, डॉ क्षमा आगरकर- कुलकर्णी (मुंबई-महाराष्ट्र) कथक नृत्य, श्रीमती सुदेशना सिन्हा (आगरतळा-त्रिपुरा) मणिपुरी, डॉ जुगनू कापडिया (सुरत- गुजरात) भरतनाट्यम इत्यादी कलाकार आपली कला प्रस्तुती देणार आहेत. यावेळी सर्व कलाकारांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्थेचा मानाचा सूरताल जीवनगौरव पुरस्कार हा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गिरधरदास देवी प्रतिष्ठानच्या संचालिका सुनिता देवी यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. तरी संगीत रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!