जनसन्मान यात्रा उद्या येणार इंदापूर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थित;आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती
(निलेश गायकवाड )
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसमान यात्रा शुक्रवार दिनांक 23 इंदापूर तालुक्यातील येणार आहे. तालुक्यातील प्रत्येक घटकांनी या जनसमान यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदापूर तालुका यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन बुधवार दिनांक 21 रोजी करण्यात आले होते. त्यावेळी भरणे बोलत होते.
यावेळी पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर शशिकांत तरंगे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील,,तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांचे lसह पदाधिकारी उपस्थित होते.
भरणे म्हणाले की सर्व घटकांसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चालू वर्षाच्या बजेटमध्ये भरीव तरतूद करून मोठ्या न्याय दिला आहे इंदापूर तालुक्यातील लाडकी बहिणी, भाऊ, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना, हे बजेट वरदान ठरले आहे.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विचार जनसमान यात्रेच्या माध्यमातून घेण्यासाठी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे.
तसेच या त्याच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या जनसमान यात्रेचे संपूर्ण तयारी केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री हस्ते 90 कोटींचे भूमिपूजन त्यामध्ये रस्ते, गटार, उजनी धरणावरून शिरसोडी फुलाच्या कामाची भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री वीरश्री मालोजीराजे यांच्याकडे चांद सावली बाबा यांचा दर्गास भेट देऊन दर्शन घेणार आहे.