हर्षवर्धन पाटील एक असामान्य व्यक्तिमत्व.

अपनी भाषा में पढ़े! Translate

हर्षवर्धन पाटील एक असामान्य व्यक्तिमत्व.

पिंपरी बुद्रुक :
दिनांक- 21/08/2024
प्रतिनिधी: समाधान रजपूत.

ज्या व्यक्तीने साखर कारखान्याचे संचालक, दुध संघाचे संचालक तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून ग्रामीण भागातून आपल्या राजकीय कारकीर्दीस यशस्वी अशी सुरुवात केली. ज्यांच्या नेतृत्वाखाली दुधगंगा सहकारी दुध संघाची व इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना झाली. ज्यांनी अवघ्या आठ महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालकीचा निरा भिमा सह. सा. कारखाना उभा करून साखर उत्पादन सुरू केले व सहकार क्षेत्रामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास घडविला. गोरगरीब जनतेच्या मुलांना कमीत कमी खर्चामध्ये सर्व सोयी सवलतीसह उच्च शिक्षण घेता यावे म्हणून मौजे वनगळी येथे शहाजीराव पाटील प्रतिष्ठाणच्या वतीने भव्य असे शैक्षणिक संकुल उभा केले. ज्यामध्ये आज अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचे कुलपती व विश्वस्त त्याचबरोबर कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. सा. कारखाना लि.चे विद्यमान अध्यक्ष म्हणून आजही ते कार्यरत आहेत. अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे . इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवत अनेक दिग्गज मुख्यमंत्र्यांसोबत 19 ते 20 वर्ष महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले व वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी सांभाळली. सहकार व संसदीय कार्यमंत्री म्हणून केलेले काम महाराष्ट्रामधील जनता अजून विसरलेली नाही. सातारा जिल्ह्याचे व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे काम केले त्या कामाची तेथील जनता अजून चर्चा करते,कौतुक करते व त्यांचे आवर्जून नाव घेते.
इंदापूर तालुक्यातील जनतेचा बुलंद आवाज, युवकांचे आशास्थान,उत्तम मार्गदर्शक, अनुभवी, पदवीधर, संयमी, सहनशील आणि प्रेमळ अशा लोकप्रिय नेतृत्वाचा अख्ख्या इंदापूर तालुक्याला अभिमान आहे. हर्षवर्धन पाटील यांना अल्फाज टाईम कडून त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!