June 28, 2025 9:05 pm

इंदापूर महाविद्यालयात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर महाविद्यालयात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप
इंदापूर प्रतिनिधी भगवान लोंढे. – पुढील धोके व दुर्घटना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी योग्य आचरण करावे- माधुरी लटकत
कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे आणि फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी कायदा , मुलींच्या सुरक्षितता व आचरण याविषयी इंदापूर पोलीस स्टेशनच्या हवालदार तसेच दामिनी पथकाच्या प्रमुख माधुरी लटकत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याची माहिती यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात दिली.
काव्यवाचन, रांगोळी, मैदानी खेळ तसेच स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनच्या हवालदार, दामिनी पथकाच्या प्रमुख माधुरी लटकत यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचे दुष्परिणाम तसेच योग्य आचरण न केल्यास होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली.आपल्याकडून होणारी थोडीशी चूक देखील खूप महागात पडू शकते यासाठी वेळीच आवश्यक दक्षता घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपप्रचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर ,क्रीडा संचालक डॉ.भरत भुजबळ , प्राध्यापिका कल्पना भोसले यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील सावंत यांनी केले.
सूत्रसंचालन राजीव शिरसट यांनी केले. आभार प्रा. रोहिदास भांगे यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!