शिवसेना कार्यालयाच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचा मान मिळाला एका पारधी समाजाच्या महिलेला.
दौंड शहर शिवसेना प्रमुख श्रीनाथ ननवरे यांचा नवा समाजिक पायंडा.
प्रतिनीधी – विकी ओहोळ
८४४६११९१५८
दौंड- शिवसेना दौंड शहर कार्यालय येथे 15 ऑगस्ट झेंडावंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर झेंडावंदन मुख्यमंत्र्याची बहीण माननीय सौ काळे ताई यांच्या हस्ते करण्यात आला होता,सौ काळे ताई यांच्यासाठी त्यांच्या जीवनातील हा महत्त्वाचा क्षण ठरला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये दौंड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जगदाळे, मा. कोंडस्कर, दाखले सर, अभिजीत भागवत, चंदू कल्पनूर, अर्जुन मंडवाले, किरण वांभिरे, श्रीकांत गुजर, सायली कांबळे, राजेंद्र वैद्य, दौंड शहर प्रमुख शिवसेना श्रीनाथ ननवरे हे उपस्थित होत तसेचे परिसरातील अनेक नागरिक दुकानदार झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थित होते. सौ काळे ताई या दौंड तालुक्यातील खोरवडी या गावच्या रहिवासी आहेत त्यांचा समाज हा पारधी आहे त्या दौंड नगर परिषदेमध्ये खाजगी तत्वावर सफाई कर्मचारी म्हणुन काम करतात पहिल्यादांच असा मान मिळाल्यामुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण झाले होते.