June 29, 2025 6:30 am

मारवड येथे महिलांसाठी ॲड.ललिता पाटील यांच्या तर्फे आरोग्य शिबीर

अपनी भाषा में पढ़े! Translate

मारवड येथे महिलांसाठी ॲड.ललिता पाटील यांच्या तर्फे आरोग्य शिबीर

अमळनेर: विक्की जाधव.

ॲड.ललिता पाटील यांच्या मार्फत मारवड येथे महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.मारवड बोरगाव गोवर्धन येथील महिलांनी या शिबीराचा लाभ घेतला व गावकऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिजाऊ बहुउद्देशीय संस्था,फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप व आधार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख ॲड.ललिता पाटील भिकन पाटील वसुंधरा लांडगे डॉ प्रतिभा मराठे निताताई शिरसाठ प्रा.आशिष शर्मा भारतीताई पाटील रेणू प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती शिबीरात ज्ञानेश्वरी पाटील, सुष्मा वाघ, अर्चना शिसोदे, मुरलीधर बिरारी व गणेश लॅबचे अमोल शहा यांचे अनमोल सहकार्य लाभले.
३०० महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. यापैकी १६ महिलांचे HB कमी निघाले. या १६ महिलांना पुढील प्रथमोपचार विनामुल्य देण्यात येत आहे. शिबीरास महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला ॲड. ललिता पाटील यांचे सर्व महिलानी आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!