रत्नापिंप्री – शिवधाम फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन
पिक विमा व विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
प्रतिनिधी- मयूर पाटील
रत्नापिंप्री ता. पारोळा सन २०२३ मधील पिक विमा योजनेचे लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने तसेच विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री – शिवधाम फाट्यावर चक्क दोन तास रस्ता रोको आंदोलन केले तब्बल दोन तासाच्या आंदोलनात वाहनांची मोठी रांगा लागल्या होत्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचाफोडत आपल्या भाषणातून शेतकरी आपले मागण्या मांडत होते यावेळी पारोळा तहसीलदार उल्हास देवरे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले
स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने पारोळा- अमळनेर रस्त्यावरील शिवधाम – रत्नपिंप्री फाट्याजवळ शेकडो शेतकऱ्यांनी आज रस्ता रोको आंदोलन सकाळी ११ वाजेपासून सुरू केले या आंदोलन अंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पिक विमा आणि सतत होणाऱ्या अन्याया विरुद्ध शेतकऱ्यांनी हा आंदोलनाचा पांयडा उचलला होता या आंदोलनांतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती विषयी आणि सतत होणाऱ्या पिक विमा कंपनीच्या द्वारे पिळवणूक यामुळे हवालदिल झालेला शेतकरी त्राही त्राही होऊन आज चक्क स्वर्गीय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि शेकडो शेतकऱ्यांनी आज रस्ता रोको आंदोलन केले चक्क दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भातील घोषणा शेतकरी करत होते शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय व विरोधात शेतकऱ्यांनी बंड पुकारला होता शेतकऱ्यांच्या या आंदोलनात गेल्या वर्षाच्या पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडत उपस्थित अधिकाऱ्यांच्या समोर या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी निवेदने देऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावे अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली यावेळी शेतकऱ्यांनी मते व्यक्त करतांना सांगितले की मागील वर्षी खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी ,मका, कापूस यांच्या अतोनात नुकसान झालं शेतकरी संघटनेने लगेच तत्परता दाखवून पिक विमा कंपनीचे संपर्क साधला आणि पंचनामा करायला लावला १५ जून पर्यंत शेतकरी विमा हप्ता भरण्याची मुदत आणि एक वर्ष उलटून गेलं तरी अजून आपल्या खात्यामध्ये पैसे पडलेले नाहीत फक्त एक तरी पंचवीसशे रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आले १०० टक्के ची विमा जोखीम आहे तर आम्हाला ७० टक्के ते ७५ टक्के विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी रास्ता रोको आंदोलन आहे विमा नुकसान भरपाई मिळाला पाहिजे यासाठी रस्ता रोको आंदोलन आहे संपूर्ण तालुक्यातील लोकांचे खूप लोकांचे पीएम किसान सन्माननीय योजना दोन हजार रुपये अजून आपल्या खात्यावर आले नाहीत अनेक शेतकऱ्यांना तहसीलला चकरा मारतात ते सांगतात आम्ही संपावर आहेत आम्ही बहिष्कार टाकला शेतकऱ्यांनी जायचे कुठे ? शेतकरी सन्मान योजना आता हा सन्मान आहे का? अपमान आहे आमच्या शेतकऱ्यांच्या तर यासाठी आम्हाला लोकशाही पद्धतीने आम्ही आज रस्ता रोको करत आहोत नुकसान योजना अंतर्गत पन्नास हजार रुपये ते सुद्धा अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले नाही दोन लाख रुपयांची कर्जमाफी ती सुद्धा मिळाली नाही असे मत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील यांनी बोलतांना सांगितले
अधिकाऱ्यांच्या मदतीने आंदोलन मागे
स्वर्गीय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकरी यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घ्यावे यासाठी पारोळा तालुक्याचे तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक सुनील पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय ढमाळे, पिक विमा प्रतिनिधी ज्ञानेश्वर रामोशी यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आम्ही तत्पर राहून वेळोवेळी केलेल्या मागण्या साठी पाठपुरावा देखील करू तर शेतकऱ्यांच्या या विविध प्रश्नाबाबत लेखी स्वरूपातील माहिती आम्ही वरिष्ठांपर्यंत पोचवणार आहोत शासन नियमानुसार आपल्या मागण्यांची निवेदने आम्ही स्वीकारली आहेत आणि ती शासन दरबारी पाठवण्याची जबाबदारी देखील आम्ही स्वीकारतो अत्यंत शांततेच्या वातावरणात रस्ता रोको आंदोलन तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने थांबविण्यात आले यावेळी पारोळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजू जाधव ,प्रवीण पाटील,आशिष गायकवाड, हिरालाल पाटील, महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला आंदोलनानंतर वाहनांना सुरळीत मार्ग काढून देण्यासाठी परिश्रम घेतले
रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा … आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका जात असल्याचे पहात शेतकऱ्यांनी विशेष पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करून दिला वाहनांच्या गर्दीच्या ठिकाणी रुग्णवाहिकेला मार्ग देण्यात आला.
या आंदोलनात स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुका अध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील ,तालुका उपाध्यक्ष अनिल पाटील,शेतकरी नेते शिवाजी पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, प्रसिद्ध प्रमुख वाल्मीक कापडणे ,माजी उपसरपंच अंकुश भागवत ,गुलाब पाटील, गोकुळ पाटील ,पंढरीनाथ पाटील, नरेंद्र धनगर ,जगदीश मनोरे ,अरविंद मराठे ,बळीराम मनोरे ,प्रकाश पाटील, सोमनाथ मराठे ,आत्माराम पाटील ,अधिकार पाटील, संजय पाटील, अनिल पाटील तसेच पारोळा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी तसेच रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री , सडावण ,भोकरबारी ,कंकराज,भिलाली ,नेरपाट आदी परिसरातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.