करमाळा :- करमाळा येथील नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्चांक मिळवणारी मुथा अबॅकस अकॅडमी 26 व 27 जुलै होणाऱ्या 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे या आंतरराष्ट्रीय परीक्षेसाठी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून व या परीक्षेची पूर्वतयारी घेण्यासाठी मुथा अबॅकस अकॅडमीने या कार्यक्रमाचे भव्य स्वरूपात आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन API रोहित शिंदे, प्रा. लक्ष्मण भोसले सर, प्रा. स्वाती बिले, पत्रकार जयंत दळवी, संस्थापिका धनश्री दळवी वृषभ भंडारी मु. सुनंदा माने, मु. चंद्रकला टांगडे, , उत्तम विटुकडे सर, पूजा शिंदे मॅडम, अश्विनी टिळेकर मॅडम, प्रा. पल्लवी टोणपे , महेश शिंदे, कोळेकर सर या सर्वांच्या हस्ते झाले. या सर्व मान्यवरांचा सत्कार मुथा अबॅकस अकॅडमी कडून करण्यात आला.
हैदराबाद येथील ऑरिस्टो किड्स आयोजित 27 जुलै व 28 जुलै रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 2150 विद्यार्थ्यांचा इतर देशातून, राज्यातून, जिल्ह्यातून सहभाग आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 7 मिनिटात 100 गणिते सोडवणे अनिवार्य होते. या परीक्षेचा सराव जास्तीत जास्त व्हावा यासाठी अरिस्टो किड्स ने दीड महिना अगोदर पासून ऑनलाईन स्वरूपात सात मिनिटाच्या अमर्याद *मॉक टेस्ट वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या होत्या. *यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, अचूकता, एकाग्रता, मनोबल, मार्क्स यामध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून आला आज रोज विद्यार्थी 5 ते 6 मिनिटात 100 गणिते सोडवण्याचा सराव करत आहे.
यावेळी गुरुपौर्णिमा निमित्त व मुथा अबॅकस अकॅडमी बद्दल विद्यार्थ्यांनी आपले मनोगत ही व्यक्त केले. व मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. मनोगत व्यक्त केलेले विद्यार्थी समर्थ कानडे, जानवी सावंत, काव्या टिळेकर, स्वरा फंड, अनुजा भोसले, आरुष बनसोडे, भक्ती सावंत, सार्थक दवणे, समीक्षा थोरे, ऋषीराज लष्कर, इशा टिळेकर, आर्यन जाधव, विराज दुग्गड, तन्मयी चोपडे, साई काळे वेदांत वारे, आदित्य कापसे, सार्थक वनारसे, हर्ष शहा, श्रावणी खराडे, श्लोक कांबळे,आर्यन जाधव, काव्या टिळेकर सर्व मान्यवरांनी व पालकांनी विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा व मौलिक मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालिका ज्योती मुथा व त्यांचा ॲकटिव्ह स्टाॅफ स्मिता वनारसे, वैष्णवी कानडे, सायली गुगळे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले