गावाच्या मूलभूत गरजांवर खर्च न करता निव्वळ गाव दरवाजावर आपल्या नावाची पाटी लागावी म्हणून चं केला हा हाठ्ठास.
टक्केवारीने झालेले निकृष्ट दर्जाचे काम ठरतेय डोकेंदुखी तर ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची होत आहे मागणी.
अमळनेर : विक्की जाधव.
सामाजिक न्याय विभागाच्या सुमारे १५ लाखाच्या निधीतून उभारण्यात येणारे अमळगाव येथील दलित वस्तीच्या गाव प्रवेशद्वार रस्त्यावरील एका बांधकामाधीन कमानीच्या सिमेंटच्या खांबांचे सुरु होते काम तेव्हाच स्लॅब काम सुरु असतानचं कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. टक्केवारीच्या या निष्कृष्ट दर्जाचा कामाबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. २५/१५ च्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १५ लाखाच्या निधी खर्च करुन अमळगाव येथे दलित वस्तीच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरु होते. काम अंतिम टप्प्यात म्हणजेच काम सुरु असताना १९ रोजी संयकाळच्या सुमारा प्रवेशद्वारावरील कॉलम आणि स्लॅब चे काम कोसळून मोठा अपघात झाला होता. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. टक्केवारीच्या या निष्कृष्ट दर्जाचा कामाबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्तकरत कार्यवाही ची मागणी केली आहे.
काय म्हणतो : १६ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णय.
१६ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त होणारा निधी हा
प्रामुख्याने गावाच्या मुलभूत गरजा आणि सुख सुविधांवर खर्च करणे अपेक्षित आहे. अशा मुलभूत. सुविधांचा अभाव असताना प्रवेशद्वार / गाव दरवाजा कमानी बांधून लोकप्रतिनिधीनी निव्वळ आपल्या नावाची पाटी लावणे योग्य नाही. विशेषतः गावामध्ये स्मशानभूमि, अंतर्गत रस्ते ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी इमारत, शाळा इमारत आणि या इमारतीमध्ये शौचालयासारख्या सुविधा नसताना प्रवेशद्वार आणि कमानी बांधण्यावर सार्वजनिक निधी खर्च केला तर इतर कामे कसे होणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी उपस्थित केला.
जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून टक्केवारी खाणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत अमळनेर ची जनता त्यांना आपली जागा नक्कीच दाखवेल.