इंदापूरच्या खेळाडूंचा जगात नावलौकिक
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा सत्कार
(निलेश गायकवाड )
अमेरिकेतील सर्वोच्च स्तरावरील बेसबॉलचे आयोजन करणारी मेजर लीग बेसबॉल (MLB) ही संस्था भारतातील प्रतिभावंत खेळाडू शोधण्यासाठी 12 वर्षाखलील मुलांचे राष्ट्रीय स्तरावरील नामांकित 16 संघाची लीग स्पर्धेचे आयोजन करते. बंगळुरू येथे संपन्न झालेल्या MLB Cup 2024 या स्पर्धेत हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या नारायणदास रामदास हायस्कूल या शाळेतील मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून sportsmanship चषक जिंकून विशाल राजेश घोगरे व रुद्र महेश पावने या दोन खेळाडूंची निवड भारतीय संघात झाली असून ते अमेरिकन लीग स्पर्धेसाठी अमेरिका या ठिकाणी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत.
संपूर्ण खर्च अमेरिकन बेसबॉल लीग करणार आहे तसेच खेळाडूंचा डायट व प्रक्टीस आणि लागणारे साहित्य याचा संपूर्ण खर्च राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील करणार असल्याचा मनोदय त्यांनी खेळाडू व पालकांच्या सत्कारावेळी व्यक्त केला तसेच खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
इंदापूर महाविद्यालयाचे क्रीडासंचालक डॉ.भरत भुजबळ यांच्या मदतीने विक्रम गलांडे व सुलतान बागवान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.