June 30, 2025 6:24 pm

कर्मयोगीचा २०२४ मध्ये १० गावत वृक्षारोपणाचा संकल्प…

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्मयोगीचा २०२४ मध्ये १० गावत वृक्षारोपणाचा संकल्प…
कर्मयोगी फाऊंडेशनने हिंगणा व नागपूर तहसील मधील गावंगाव स्वच्छ सुंदर व समृद्ध करण्याचा संकल्प केला आहे. त्याच अनुषंगाने काळाची गरज लक्षात घेता निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी गायत्री परिवार नागपूर, कर्मयोगी फाऊंडेशन व स्थानिक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलै ते ११ जुलै दरम्यान मांगली, शिरुळ, सावंगी, वारंगा, वाकेश्वर, खरडा, पोही, बोरखेडी रेल्वे, देवळी गुजर व वडगाव गुजर या १० गावात सकाळी ७ ते ९ या वेळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून प्रत्येकी ५० झाडे लावून झाडांचा जनावरांपासून बचाव व्हावा यासाठी कठड्यांची व्यवस्था करून देत गायत्री परिवारातर्फे झाडांचे जीवनात काय महत्व आहे यावर गावकऱ्याना मार्गदर्शन सुद्धा करून देण्यात येणार आहे. कर्मयोगीच्या गावोगावी झाडे लावूया, गावंगाव स्वच्छ, सुंदर, समृद्ध व हिरवेगार बनवूया या उपक्रमासाठी निसर्गप्रेमींनी झाडांच्या स्वरूपात जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी मदत करावी. यासाठी कर्मयोगीचे सरचिटणीस शिवाजी बरेवार 9011779009 यांच्याशी संपर्क साधण्याचे कर्मयोगी कडुन आवाहन करण्यात आले आहे..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!