प्रताप महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
अमळनेर : विक्की जाधव.
शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. सचिन पाटील , प्रा. अमृत अग्रवाल व प्रा. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाने साजरा करण्यात आला. प्रा. अर्चना पाटील यांनी उपस्थितांना दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले व योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. याप्रसंगी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य व खान्देश शिक्षणं मंडळाचे सचिव डॉ. ए. बी. जैन, सहसचिव व सिनेट सदस्य प्रा. डॉ. धीरज वैष्णव, जिमखाना प्रमुख व सिनेट सदस्य डॉ.संदीप नेरकर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोनवणे सर, उपप्राचार्य डॉ कल्पना पाटील, प्रा. डॉ. व्हीं. बी. मांटे, प्रा. अमोल मानके, प्रा रामदास सुरळकर, प्रा.हर्षल बडगुजर, प्रा. प्रमोद चौधरी, प्रा. विवेक बडगुजर, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. वैशाली महाजन, बाळू देवकाते तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
सूत्रसंचालन रासेयो प्रमूख प्रा. हेमंत पवार यांनी केले तर प्रा. सचिन पाटील यांनी आभार मानले.