साठे नगर, तुकाई नगर, भिमनगर, कुंभार गल्ली भागातील पाण्याची काळी नवीन पाईपलाईन त्वरित सुरू करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा.- दौंड तालुका कॉंग्रेस कमिटी
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – दौंड नगरपरिषदेने अंदाजे 5 ते 6 वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्याची काळी पाईपलाईन टाकली होती . सध्या शहरातील इतर ठिकाणची पाईपलाईन सप्लाय सुरु केला असून साठे नगर, तुकाई नगर, भिमनगर या ठिकाणच्या पाण्याचा नवीन लाइन चा सप्लाय आजपर्यंत का सुरु करण्यात आला नाही. या ठिकाणी या विषयात लक्ष देण्याची गरज आहे. या निवेदनाचा विचार न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दौंड तालुका कॉंग्रेस कमिटी यांनी दिला आहे. जुन्या पाईप लाईन चे आयुष्य संपलेले आहे अनेक ठिकाणी लोखंडी लाइन गंज लागल्यामुळे खराब झालेली आहे त्याच शेजारी गटारींची चेंबर असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याच्या पाण्यात मिक्स होऊन तसाच पाणीपुरवठा पुढे चालू राहतो यामुळे अनेक आजारांची संख्या वाढली असून लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे संजय पठारे युवा अध्यक्ष, महेश जगदाळे किसान मोर्चा ,अतुल थोरात शहर उपाध्यक्ष व प्रकाश सोनवणे महासचिव दौंड तालुका आणि दौंड तालुका कॉंग्रेस कमिटी यांनी दौंड नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.