शहरात आणि तालुक्यात सर्रास वृक्ष तोड, कारवाईची मागणी. जबाबदार अधिकाऱ्यांचा कानाडोळा..
अमळनेर : विक्की जाधव..
अमळनेर तालुक्यात सर्रास वृक्ष तोड सुरु असल्याचे चित्र आहे.मात्र याकडे कुणीही लक्ष घालत नसल्याने , वृक्ष तोडीवर आळा घालून कारवाईची मागणी वृक्षमित्रांमधून होत आहे.
दरवर्षी पावसाळा अत्यल्प होत चालला असताना दिवसेंदिवस सर्वत्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
दिवसेंदिवस वाढणारे तापमान याला वृक्ष तोड कारणीभूत आहे. शहरासह तालुक्यातील काही थोड्याशा पैसेकरिता शेतातील मध्यभागी व बांधावर उभे असलेले डेरेदार वृक्ष तोडले जात आहेत. परिणामी झाडांची संख्या खूपच कमी झालेली आपणास दिसून येत आहेत.
वृक्षतोड करणारी टोळी सक्रीय.
परिसरात एक दिवस अगोदर येऊन वृक्ष तोड करणाऱ्याचे तालुक्यात सर्वत्र दलाल सक्रिय आहेत.या दलांला मार्फत परिसराची पाहणी करून गेल्यानंतर वृक्षतोड करणारी सात ते आठ जणांची ही टोळी अत्याधुनिक सामुग्र्रीच्या साहाय्याने डेरेदार वृक्षाला एका तासाभरात त्याचे लहान-लहान तुकडे करून गाडीत भरून नेतात त्याठिकाणी डेरेदार वृक्ष होता की नाही हेच कळत नाही.
अत्याधुनिक अवजारानमुळे डेरेदार वृक्ष काही वेळेतच भूमीगत आडवा पडून नष्ठ केले जात असल्याने वृक्ष प्रेमीनमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र याबाबत जबाबदार अधिकारी यानी लक्ष घालून कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. सर्वत्र वृक्ष तोड सुरु असताना संबंधीत अधिकारी झोपेचे सोंग घेऊन कानाडोळा करीत असल्याचा आरोप जनसमुदायां कडून होत आहे.