साने गुरुजी विद्यालयात गुणवंतांचा गौरव व नवागतांचे स्वागत करण्यात आले..  

अपनी भाषा में पढ़े! Translate

साने गुरुजी विद्यालयात गुणवंतांचा गौरव व नवागतांचे स्वागत करण्यात आले..

 

अमळनेर : विक्की जाधव..

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एसएससी मार्च 2024 परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव करण्यात आला. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या नवागतांचे स्वागत इयत्ता आठवीची पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले‌. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था सचिव संदीप घोरपडे होते. यावेळी मुख्याध्यापक सुनिल पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे, सहसचिव ॲड.अशोक बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक गुणवंतराव पाटील, भास्करराव बोरसे, किरण पाटील, शिक्षण तज्ञ गोकुळ बोरसे, हिम्मतराव पाटील, इंजिनीयर विजय बाविस्कर, शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी उपस्थित होते. विद्यार्थी मनोगत नयन पाटील व प्रांजल कुसुंबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष उघडे व जे.एस.पाटील तर आभार प्रदर्शन डी.ए.धनगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!