शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पेन देऊन केले स्वागत..
अमळनेर: विक्की जाधव.
लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात आज शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मनोहर महाजन, जेष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी, जेष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर, सायली देशप तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते. यावेळी मनोहर महाजन यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत व मार्गदर्शन केले.