November 22, 2024 3:51 am

आमच्याकडे कोणाचीही युती होऊ शकते पण पाऊस आणि महावितरणाची युती अशक्यच..

अपनी भाषा में पढ़े! Translate

आमच्याकडे कोणाचीही युती होऊ शकते पण पाऊस आणि महावितरणाची युती अशक्यच..

 वाटीभर पाऊस पडला की रात्रभर लाईट गेलीच समजा..

अमळनेर : विक्की जाधव..  शहरात मागील काही दिवसांपासून विजेची मोठया प्रमाणात समस्या निर्माण होत असुन नागरिकांमध्ये बैचैनी झाली असून या समस्यावर बोलणारे कोणी आहे का असा प्रश्न पडला आहे. एकीकडे भल्या मोठ्या प्रमाणात तापमानाचे चाटके सामान्य माणूस सहन करत आहे तर दुसरीकडे भर दुपारी महावितरणाची लाईट गुल असते. तर महावितरण अधिकारी सामान्यांचे फोन घेण्यास असमर्थता दाखवतात,

मान्सूनपूर्व वादळामुळे विजेच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या असल्या तरी नवीन विद्युत पोल, पाणी पुरवठ्याचा विद्युत पुरवठा, कृषी पंपाचे विद्युत कनेक्श्‍न यासह अनेक समस्या अद्यापही कायम आहेत. काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून विद्युत तारांवर पडल्याने विद्युत पोल क्षतीग्रस्त झाले होते. तसेच अनेक ठिकाणी जनावरांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने पाण्याअभावी जनावरे मृत पावताहेत. अनेक गावे अंधारात बुडालेली असतात बऱ्याच ठिकाणी रात्री आणि दिवसा लाईटच नसते. अजुनही बहुतांश ठिकाणी बऱ्याच अडचणी आहेत. काही गावांमध्ये जुने झालेले विजेचे खांब उन्मळून पडल्याने त्याठिकाणी नवीन पोलची आश्‍यकता आहे. काही ठिकाणी ट्रान्सफार्मर नाहीत, नवीन विजेच्या तारा ओढणे अशा अडचणी दूर करण्यात येवून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अशी मागणी होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!