अमळनेर तां. गोवर्धन. घरी परिवारासह झोपलेल्या असताना तालुक्यातील गोवर्धन येथील भावाला व त्याच्या पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मारवड पोलिस स्टेशन ला फिर्याद देण्यात आली असुन याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास रत्नाबाई सुरेश पवारं ह्या घरी सहपरिवार झोपलेल्या असताना बाजूला राहणारे चुलते ( जेठ ) गोविंदा लक्ष्मण पवार, आणि त्याची पत्नी रमणबाई पवार व मुलगा जयेश पवार यांनी घराच्या दरवाज्याला लात मारून दरवाजा उघडत नाहीतर तुला…. नाही आश्या उर्वच्च भाषेत शिव्या देऊन फिर्यादी महिलेला व तिचे पती सुरेश पवार यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याने मारवड पोलिसांत फिर्याद नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.