July 1, 2025 10:20 am

भैरवनाथ विद्यालय भिगवण यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान..

अपनी भाषा में पढ़े! Translate

भैरवनाथ विद्यालय भिगवण यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान..
रयत शिक्षण संस्थेचे, भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भिगवण ,ता. इंदापूर जि.पुणे येथे नुकताच इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावी मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला . यावेळी कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यालयात उपस्थित स्कूल कमिटीचे सदस्य श्री मानसिंग(तात्या) जाधव व श्री राहुल गाडे तसेच तक्रारवाडी चे माजी केंद्रप्रमुख श्री शिंदे सर ,विद्यालयाचे प्राचार्य श्री भोसले विजयकुमार सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित ग्रामस्थ व पालक वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यालयाच्या वतीने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये इयत्ता बारावी कला मधून प्रथम क्रमांक कु.बंडगर पूजा ज्ञानदेव 81.17% द्वितीय क्रमांक भंडारे स्वप्निल आसाराम 75.83% तृतीय क्रमांक चव्हाण करण प्रवीण 75% तर विज्ञान शाखेमधून प्रथम क्रमांक कुमारी कांबळे साक्षी 73.67%द्वितीय क्रमांक कुमारी गायकवाड दिव्या संतोष 73.33%तृतीय क्रमांक सकुंडे प्राची पोपट 69% तर इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमधून प्रथम क्रमांक खरात प्रज्वल अण्णासो 97%,द्वितीय क्रमांक ठवरे प्रगती भाऊसो आणि 93.60%तृतीय क्रमांक शेख आवेज शब्बीर 93.30 या विद्यार्थ्यांनी प्राप्त करून त्यांना विद्यालयाच्या वतीने भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख श्री शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळा व्यवस्थापन व विकास समिती, आजी-माजी विद्यार्थी संघ आणि भिगवण पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव विविध स्तरातून होत आहे. शेवटी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री टेंबरे सर यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!