सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत कोण मारणार बाजी उरले काही तास निकालाकडे? चित्र स्पष्ट होणार

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत कोण मारणार बाजी उरले काही तास निकालाकडे? चित्र स्पष्ट होणार

(निलेश गायकवाड )

महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली आहे. कारण गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेल्या पवार कुटुंबातील दोन व्यक्तीनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. नणंद-भावजयच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेय. बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार साहेबांसोबत इमोशनली कनेक्टेड आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे . प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता. मतदानाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर असून या लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.

बारामतीमध्ये एकूण 59.50 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात काहीशी घट झाली आहे. 2019 मध्ये बारामतीत 61.70 टक्के मतदान झाले होते. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत ही अटीतटीची आहे. त्यामुळे मतदानातील ही साधारण 2 टक्क्यांची घटही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामधील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास खडकवासला आणि पुरंदरमध्ये मतदानाची सर्वाधिक कमी टक्केवारी नोंदवली गेली आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याने या भागातून सुनेत्रा पवार यांना मोठी लीड मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, खडकवासला मतदारसंघात अवघे 51.55 टक्के मतदान झाले आहे. ही महायुतीच्यादृष्टीने चिंताजनक बाब मानली जात आहे. याशिवाय, सुरुवातीच्या काळात अजित पवार यांना कडवा प्रतिकार करणाऱ्या विजय शिवतारे यांच्या पुरंदरमध्ये अवघे 53.96 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वाधिक मतदान बारामती मध्ये झाले आहे.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान?

एकूण मतदान – 59.50 टक्के
दौंड – 60.29 टक्के
इंदापूर – 67.12 टक्के
बारामती – 69.48 टक्के
पुरंदर- 53.96 टक्के
भोर – 60.11 टक्के
खडकवासला – 51.55 टक्के

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?
दौंड – राहुल कुल
इंदापूर – दत्तात्रय भरणे
बारामती – अजित पवार
पुरंदर- संजय जगताप
भोर – संग्राम थोपटे
खडकवासला – भिमराव तापकीर

प्रचारात कोणाची बाजी?
2009 पासून सुप्रिया सुळेंना, शरद पवारांना इथे फार लक्ष द्यायची वेळ कधीच आली नाही . फक्त लीड मोजायची आणि जिंकल्याचं प्रमाणपत्र घेऊन जायचं एवढंच काम सुप्रिया सुळेंसाठी शिल्लक असायचं. आता मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे हे चित्र बदललं आहे. पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार समोरासमोर आहेत. एकीकडे अजित पवारांची कुटुंबाने साथ सोडली तरी हर्षवर्धन पाटील, विजय बापू शिवतारे, राहुल कुल जोमाने कामाला लागले आहेत. एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस- अजित पवार यांनी ग्राऊंड लेव्हलवरील सर्व नियोजन व्यवस्थित केलं आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंसोबत अख्ख पवार कुटुंब दिसले. सर्वात म्हणजे शरद पवार गटाकडून ही निवडणूक भावनिक करण्यात आली आहे.

या सर्व परिस्थिती पाहता उद्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!