खबर पक्की विजय नक्की असे स्लोगन वापरून विजया आधीच खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकले… माळेगाव, ता. बारामती येथील कट्टर समर्थक मयुर भोसले यांचा बॅनर चर्चेत…
बारामती (सह – संपा दक – संदिप आढाव)
केवळ राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास काही तास वेळ बाकी असतानाच माळेगांव येथे त्यांच्या विजयाचे बॅनर झळकल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा.सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नणंद भावजय मधे टफ फाईट होत आहे.या निवडणुकीत कोण विजयी होणार हे मंगळवार दि.०४ रोजी ठरणार आहे.
असे असताना नगर पंचायत माळेगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक उपाध्यक्ष मयुर भोसले यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर उभारले आहेत.यामुळे माळेगांव व परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान एक्झिट पोलने दिलेल्या कौलानुसार खा.सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित असल्याने खबर पक्की विजय नक्की असे स्लोगन वापरून विजयी बॅनर उभा केल्याचे युवक उपाध्यक्ष मयुर भोसले यांनी सांगितले.
