चोपडा आगाराची एस. टी.बस मारवड, कळमसरे शहापूरमार्गे सुरू झाल्याने कळमसरे तसेच परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
सुरुवातीला ही सेवा मारवड वासरे-खेडी मार्गाने सुरू झाली होती. मात्र प्रवाशी संख्या कमी असल्याने ही सेवा
बंद झाली होती. शिवाय बऱ्याच दिवसांपासून कळमसरे व परिसरातील ग्रामस्थांची ही बस कळमसरे मार्गे सुरू
व्हावी, यासाठी मागणी होती. त्यामुळे चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी १ जून या एसटीच्या
वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बससेवा सुरू केली आहे.
ही बस चोपडा आगारातून अमळनेर धार, मारवड, कळमसरे, शहापूर, बेटावद, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा
मार्गे नंदूरबारपर्यंत धावेल. चोपडा येथून सकाळी ७वा जता निघेल तर नंदूरबार येथे ११:१५ वा जता पोहोचेल. नंदूरबारहून बस परत सकाळी ११:४५ वाजता निघेल. चोपडा येथे ४:३० वाजेपर्यंत पोहोचेल.तर मारवड येथे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत येईल व नंदुरबारहून चोपडा जाताना दुपारी अडीच वाजेपर्यंत येईल.
कळमसरे ग्रा. पं.ने एसटी वाहक नितेश पाटील, चालक एम. जी. जगताप, वाहक आर. जे. पवार यांचा ग्रा.
पं. तर्फे सदस्य दिनकर पारधी विकासोचे संचालक योगेंद्रसिंह
राजपूत, मधुकर पाटील, भरत महाजन,
विठ्ठल नेरकर, अंबालाल राजपूत, राजेंद्र
चौधरी, पत्रकार गजानन पाटील यांनी
सत्कार केला.