अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी दाऊद ला एमपीडीए करून केली ठाणे येथे रवानगी..
शुभम देशमुख उर्फ दाऊद वर पुन्हा एमपीडीए कारवाई करून ठाणे कारागृहात रवाना करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम देशमुखने
एमपीडीए कारवाईत कारागृहातून सुटल्यांनतर लक्झरी चालक जयंत पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करून फरार झाला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी त्याचा शोध घेऊन धुळे येथील एका खानावळीतून ताब्यात घेतले होते.
डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील यांच्याकडून प्रस्ताव तयार करून डीवायएसपी नंदवाळकर याच्यामार्फत पुन्हा शुभम देशमुख विरुद्ध एमपीडीए प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तो प्रस्ताव मंजूर केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक
अजित साळवे, चरण पाटील, प्रशांत पाटील, नितीन मनोरे यांनी शुभमला नंदुरबार कारागृहातून
ताब्यात घेतले असून शुभमला ठाणे कारागृहत रवाना करण्यात आले.