माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत दौंड नगरपरिषदेने राबवले प्लास्टिक बंदी अभियान.
काही व्यापाऱ्यांवर कारवाई तर काहींना कापडी पिशवी वापरण्याचा सल्ला.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – दौंड नगरपालिका हद्दीत स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात आली. सदर मोहीम दौंड नगरपरिषदेच्या मुख्यअधिकारी विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. प्लास्टिक बंदी मोहीम राबवत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फिल्ड ऑफिसर संदीप पाटील, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी विशाल भंडारे , दौंड नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख शाहू पाटील, आरोग्य विभागाचे कर्मचारी सागर सोनवणे, रोहन साळवे, महादेव माने, सचिन दळवी निरंजन वाघमारे, विनोद चितारे, शहर समन्वयक शुभम चौकटे इत्यादींनी दौंड शहरातील मुख्य बाजार पेठेतील कपड्याची दुकाने, हॉटेल, भाजी मार्केट, फळ मार्केट इत्यादींची पाहणी करून अनेक विक्रेत्यांकडून मिळुन अंदाजे पाच हजार रुपये दंड वसूल केला, भेट दिलेल्या सर्व दुकान मालकांना कापडी पिशव्या वापराव्यात याबद्दल सूचना देण्यात आल्या. दौंड शहरातील नागरिकांनी खरेदी करण्यासाठी जाताना कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन दौंड नगरपरिषद यांचेकडुन करण्यात आले.