गटशिक्षणाधिकारी यांनी तुमच्यात धमक असेल तर खुशाल चौकशी करावी आम्ही चौकशी ला सामोरे जाण्यास तयार ऍड योगेश पाटील..
अमळनेर : विक्की जाधव.
भटू पाटील आणि योगेश पाटील यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी अनुदानासाठी 5 टक्के लाच मगितल्याचा आरोप केला. काल सायंकाळी दत्त गुरू इंग्लिश मिडीयम स्कुल चे संस्थाचालक योगेश पाटील ADV आणि भटू पाटील संचालक यांनी पत्रकार परिषद घेत यावेळी भटू पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी
मंजूर होऊन आलेल्या अनुदानावर व आर टी ई रकमेवर 5 टक्के इतकी लाच मागितल्याचे सांगितले देऊ ही पण आम्ही कोणत्याही प्रकारचे गैर काम केलेले नाही तर 5 टक्के देऊ कशाला असे अडव्होकेट योगेश पाटील यांनी सांगितले गटशिक्षणाधिकारी यांनी तुमच्यात धमक असेल तर खुशाल चौकशी करावी आम्ही चौकशी ला सामोरे जाण्यास तयार आहोत पण अशी संस्थेची बदनामी होईल हे धंदे थांबवाबे, दोषी आढळलो तर सर्व रक्कम एकरकमी भरेल मी स्वतःत्यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा
दाखल करणार असल्याचे सांगितले. याबाबत आमच्या शाळेला अधिकृत मान्यता असून आम्ही चळवळीतुन आणि आमच्या मेहनतीने शाळा उभी राहिली आहे. ज्यांची लायकी नाही त्यांना आम्ही टक्केवारी कशी द्यायची असे ही त्यांनी बोलून दाखवले.